IPL 2023 : सूर्यकुमार यादव याने मॅच मारली पण ‘या’ पठ्ठ्यानेच रचला विजयाचा पाया!

सूर्याने आपल्या खेळीमध्ये आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. सूर्याने केलेल्या बॅटींगला तोड नाही पण मुंबईच्या विजयाचा छोटा पॅकेड बडा धमाका करणाऱ्या  ईशान किशन याने खऱ्या अर्थाने पाया रचला.

IPL 2023 : सूर्यकुमार यादव याने मॅच मारली पण 'या' पठ्ठ्यानेच रचला विजयाचा पाया!
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 12:25 PM

मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स संघाने मंगळवारी झालेल्या आरसीबीविरूद्ध सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईने 200 धावांचं लक्ष्य अगदी सहज गाठलं, रोहित फ्लॉप गेल्यावर सूर्यकुमार यादव त्याच्या फॉर्ममध्ये परतला. मिस्टर 360 प्लेअर म्हणून सूर्याने आपली ओळख का बनवली आहे हे त्याने कालच्या सामन्यातून दाखवून दिलं. सूर्याने आपला दांडपट्टा चालू केल्यावर आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. सूर्याने केलेल्या बॅटींगला तोड नाही पण मुंबईच्या विजयाचा ‘छोटा पॅकेड बडा धमाका’ असणाऱ्या  ईशान किशन याने खऱ्या अर्थाने पाया रचला.

मुंबई संघ बॅटींगला उतरल्यावर स्ट्राईकवर ईशान किशन होता. ईशानने पहिल्या ओव्हरपासूनच टॉप गिअर टाकलेला होता, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड यांनी त्याने टार्गेट केलं होतं. पठ्ठ्याने पॉवर प्लेमध्येच  आरसीबीच्या गोलंदाजांना निबार फोडलं होतं. ईशान किशनने 200 धावांचा पाठलाग करताना कोणताही दबाव येऊ दिला नाही.

कर्णधार रोहित शर्मासोबत 51 धावांची ओपनिंग भागीदारी केली होती, यामध्ये रोहितने अवघ्या 7 धावा  केल्यास होत्या. बाकी सर्व काम ईशानने केलं होतं त्यामुळे मुंबईला जशी सुरूवात हवी होती ती किशनने करून दिली होती. तोडफोड बॅटींग करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा स्ट्राईक बॉलर असलेल्या जोश हेजलवुडला त्याने गगनचुंबी 102 मीटरच षटकार खेचला. किशन याने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली यामध्ये त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले.

वानिंदु हरसंगा यालाही त्याने सिक्सर मारत सुरूवात केली होती. मात्र त्या ओव्हरमध्येच ईशान किशन आणि रोहित शर्मा यांना आऊट करत सामन्यात ट्विस्ट आणला होता. मात्र त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी संपूर्ण सामना एकतर्फी केला.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.