M S Dhoni | चाहत्यांना टाटा, हात जोडून नमस्कार, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी निवृत्तीबाबत बोलताना भावूक
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवल्यानंतर संवाद साधला. यादरम्यान धोनीने बोलताना निवृत्ती.......
कोलकाता | चेन्नई सुपर किंग्स टीमने कोलकाता नाईट रायडर्स टीमवर 49 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने यासह आयपीएल 16 व्या सिजनमधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. चेन्नईचा या मोसमातील हा एकूण दहावा विजय ठरला. चेन्नईने यासह पॉइंट्सटेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. चेन्नई या मोसमात 10 पॉइंट्स मिळवणारी पहिलीची टीम ठरली. चेन्नईने पहिले बॅटिंग करताना केकेआरसमोर विजयासाठी 236 धावांचे आव्हान ठेवले. मात्र केकेआरला 8 विकेट्स गमावून 186 धावाच करता आल्या. केकेआरला आपल्या घरच्या मैदानात म्हणजेच इडन गार्डनवर पराभूत व्हावं लागलं. या सामन्यादरम्यान आणि चेन्नईच्या या विजयानंतर मैदानात फक्त धोनी धोनी असा जयघोष होत होता. हजारोंच्या संख्येत धोनी चाहते हे सीएसकेच्या जर्सीत आले होते.
कट्टर कोलकाता समर्थक असूनही धोनीच्या प्रेमापोटी हे चाहते मैदानात आले होते. मनात कोलकाता टीम असूनही फक्त धोनी धोनी असं मनापासून ओरडत होते. असंख्य चाहत्यांनी धोनीला इडन गार्डनवर भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. चाहत्यांच्या हातात असंख्य फलक दिसत होते. या फलकावर प्रत्येक धोनी चाहत्याने संदेश लिहून आणला होता. कुणी त्या फलकातून धोनीचे आभार मानले, तर कुणी आठवणी जाग्या केल्या.
धोनीने मानले चाहत्यांचे आभार
"Thanks alot to the Eden Gardens crowd. They came to give me a farewell"
– MS Dhoni ?pic.twitter.com/s6c5Qwf8y8
— pathirana stan (@icskian) April 23, 2023
धोनीचा हा अखेरचा आयपीएल असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात होती. मात्र धोनी सामन्यानंतर जे काही म्हणाला त्यानंतर क्रिकेट चाहते म्हणजेच धोनी चाहते भावूक झाले. सर्व क्रिकेट चाहत्यांना ज्याचा अंदाज होता धोनीने त्याचबाबत म्हणजेच आयपीएल निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.
धोनी सामन्यानंतर काय म्हणाला?
धोनीने विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना निवृत्तीबाबत काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात. “मी फक्त समर्थनासाठी धन्यवाद म्हणेन ते मोठ्या संख्येने आले होते. यातील बहुतेक जण पुढच्या वेळी केकेआरच्या जर्सीमध्ये मैदानात येतील. ते मला निरोप देण्याचा प्रयत्न करत आहेत” त्यामुळे मी उपस्थितांचे खूप खूप आभार मानतो”,अशी प्रतिक्रिया धोनीने दिली.
धोनीची प्रतिक्रिया
Not convinced yet this is your last ipl @msdhoni as a fan not ready to give you a farewell ?. The reason i am watching ipl is you❤️. You are not just a player you are a emotion to me. Can't get a chance to see you in stadium,hope one day I'll meet you #dhoniforever #captaincool pic.twitter.com/YPI5FNDnfs
— Ruchira Chikode (@ChikodeRuchira) April 23, 2023
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना.