KKR vs LSG | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊ टीममध्ये सर्वात मोठा बदल
खनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात मोठा बदल केला आहे.
पश्चिम बंगाल | कोलकातामधील इडन गार्डनमध्ये आयपीएल 16 व्या मोसमातील 69 वा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. कोलकाताने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. लखनऊला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. तर कोलकाताही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मात्र केकेआरचं प्लेऑफमधील समीकरण हे दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्यामुळे केकेआरचं प्लेऑफमधील भवितव्य हे जरतरच्या समीकरणावर अवलंबून आहे.
लखनऊचा या सामन्यात विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. लखनऊने केकेआर विरुद्धच्या सामन्याआधी आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल केला आहे. हा बदल इतका मोठा आहे की क्रिकेट चाहत्यांनाही धक्का लागलाय.
नक्की काय झालं?
लखनऊने केकेआर विरुद्धच्या सामन्याआधी टीममध्ये बदल केलाय. लखनऊ केकेआर विरुद्धच्या सामन्यात नव्या रुपात खेळायला उतरली आहे. लखनऊ या सामन्यात नव्या जर्सीत खेळायला आली आहे. लखनऊ टीम कोलकाताच्या फुटबॉल क्लब मोहन बागानला सन्मानित करण्यासाठी नव्या जर्सीत उतरली आहे. लखनऊने मोहन बागान फुटबॉल क्लबची जर्सी परिधान केली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सची नवी जर्सी
Green and Maroon is a ???? ?♥ pic.twitter.com/ucBcNTblt1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 19, 2023
पॉइंट्सटेबलमध्ये कोण कुठे?
लखनऊ आणि केकेआर ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 13 सामने जिंकले आहेत. लखनऊने 7 सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे वाया गेल्याने लखनऊला एक पॉइंट मिळाला. त्यामुळे लखनऊच्या नावावर 15 पॉइंट्स आहेत. तर केकेआर 6 सामन्यात विजयी झाली आहे. तर 7 मॅचमध्ये पराभूत झाली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क्स स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बदोनी, के गौथम, के शर्मा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि नवीन-उल-हक.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅर्णधार), जेसन रॉय, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.