Rinku Singh Team India | रिंकू सिंह याची टीम इंडियात निवड? त्या फोटोमुळे जोरदार चर्चा
रिंकू सिंह याने खऱ्या अर्थाने आयपीएल 2023 गाजवलं. रिंकू सिंह याला कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी दिल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंह याने लखनऊ सुपर जायंट्स विरद्ध 177 धावांचा पाठलाग करताना नाबाद 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. रिंकू सिंह याची ही खेळी अवघ्या 1 धावेमुळे व्यर्थ ठरली. लखनऊने केकेआरवर 1 धावेने विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक मारली. केकेआरचा 1 रन्सने थरारक सामन्यात पराभव झाला. मात्र रिंकूने आपल्या या खेळीने पुन्हा एकदा आपल्या प्रेमात पाडलं. रिंकूने याआधी गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटच्या ओव्हमध्ये 5 बॉलवर 5 सिक्स ठोकूने केकेआरला विजयी केलं होतं. तेव्हापासून रिंकू आयपीएल स्टार ठरलाय. आता रिंकूने लखनऊ विरुद्ध 67 धावा करत नेटकऱ्यांची मनं त्यांनी पुन्हा एकदा जिंकली आहे.
रिंकू सिंह याला या खेळीनंतर टीम इंडियात संधी द्यायला हवी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. ट्विटरवर हॅश्टॅग टीम इंडिया ट्रेंड होत आहे. तसेच रिंकूचा टीम इंडियाच्या जर्सीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे रिंकूची टीम इंडियात निवड झाल्याचा गैरसमज नेटकऱ्यांचा झाला आहे. मात्र रिंकूला आयपीएल गाजवल्यानंतर येत्या काळात लवकरच टीम इंडियाचे द्वार उघडे होणार असल्याच निश्चित समजलं जात आहे.
रिंकू सिंह याचा टीम इंडिया जर्सीतील व्हायरल फोटो
If Lord Rinku Singh does not play for India after this IPL then it is not Rinku's loss but Indian team's loss#KKRvsLSG pic.twitter.com/0GCt6BaaWM
— ͏ aqqu (@aqquwho) May 20, 2023
रिंकू सिंह याची आयपीएल 2023 मधील कामगिरी
रिंकू सिंह याने आयपीएल 16 व्या मोसमात केकेआरकडून 14 सामन्यात खेळला. रिंकूने या सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरी आणि 149.53 च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. रिंकूने या खेळीत 31 फोर आणि 29 सिक्स ठोकले. तसेच 4 अर्धशतकंही लगावली. लखनऊ विरुद्धची नाबाद 67 धावांची खेळी ही रिंकूच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क्स स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बदोनी, के गौथम, के शर्मा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि नवीन-उल-हक.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅर्णधार), जेसन रॉय, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.