KKR vs RCB | मराठमोळ्या शार्दुल ठाकुरवर शाहरूख खान फिदा, आरसीबीला ‘इतक्या’ धावांचं आव्हान

आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी 205 धावांचं लक्ष्य असणार आहे. सलामीवीर रहमनुउल्लाह गुरबाज याचंही अर्धशतक केकेआरसाठी महत्त्वाचं ठरलं.

KKR vs RCB | मराठमोळ्या शार्दुल ठाकुरवर शाहरूख खान फिदा, आरसीबीला 'इतक्या' धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:45 PM

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी केली. पहिल्यांदा बॅटींग करताना शार्दुल ठाकुरची 68 धावांची तुफानी खेळी आणि रिंकू सिंगच्या 46 धावांच्या जोरावर 204 धावा केल्या आहेत. आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी 205 धावांचं लक्ष्य असणार आहे. सलामीवीर रहमनुउल्लाह गुरबाज याचंही अर्धशतक केकेआरसाठी महत्त्वाचं ठरलं.

केकेआरची बॅटींग

सलामीला आलेला व्यंकटेश अय्यरला 3 धावा काढून बाद झाला, त्याच ओव्हरमध्ये मनदीप सिंहही शून्यावर बाद झाला. दुसरीकडे रहमनुउल्लाह गुरबाजने एक बाजू लावून धरली होती. कर्णधार नितीश राणाही 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर रिंकू सिंग आला आणि डाव सांभाळला. कर्ण शर्माने लागोपाठ गुरबाज आणि खरतनाक रसेलला बाद करत कोलकाताच्या आशा संपवल्या.

रसेल बाद झाल्यावर आलेल्या शार्दुल ठाकुरने पहिल्या बॉलपासूनच आक्रमण सूरू केलं. तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस ठाकुरचा होती. शार्दुलने आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही त्याने सर्वांचा खरपूस समाचार घेतला. खतरनाक बॅटींग करत असलेल्या शार्दुलने अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतरही गडी शांत नाही झाला. सामन्याच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत त्याने आक्रमकपणे बॅटींग करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. अखेर 68 धावांवर तो आऊट झाला. शार्दुलला साथ मिळाली ती रिंकू सिंगची, त्यानेही स्ट्राईक रोटेट करत संधी मिळेल तेव्हा मोठे फटके खेळले आणि 46 धावांचं महत्वाचं योगदान दिलं.

दरम्यान, आरसीबीच्या डेविड विली, कर्ण शर्मा यांनी दोन तर मोहम्मद सिराज, ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांना 1 बळी मिळवता आला. आरसीबी या लक्ष्याचा पाठलाग करण्यात यशस्वी होतं की नाही हे पाहावं लागणार आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.