IPL 2023, KKR vs RCB | टॉसदरम्यान मोठी गडबड, नक्की काय झालं?
टॉससाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबीचे कर्णधार नितीश राणा आणि फाफ ड्यु प्लेसिस मैदानात आले. नितीशने टॉस उडवला. मात्र त्यानंतर पुढे काय झालं?
कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमातील नववा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येत आहे. या दोन्ही संघांचा या मोसमातील हा दुसरा सामना आहे. आरसीबीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजय मिळवला. तर कोलकाताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फॅफ डु प्लेसिसने टॉस जिंकला आहे. फॅफने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या टॉस दरम्यान काही क्षणासाठी मोठी गडबड झाली. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार नितीश राणा आणि फाफ डु प्लेसिस उपस्थित होते. त्यांच्यासोबत समालोचक संजय मांजरेकर आणि मॅच रेफरी शक्ती सिंह हे हजर होते. नितीशने टॉस उडवला. या दरम्यान शक्ती सिंह यांना फॅफचा चुकीचा कॉल ऐकू आला. यातून हा सर्व प्रकार घडला.
नितीशने टॉस उडवला. त्यानंतर शक्ती सिंह यांनी तो टॉस पाहिला आणि हेड्स असं म्हणत नितीशकडे इशारा केला. मात्र आपण हेड्स म्हटल्याचं फॅफ म्हणला. तेवढ्यात संजय मांजरेकर यांनी फाफचा टॉस नीट ऐकला होता. त्यामुळे मांजरेकर यानी मध्यस्थी करत फाफ हेड्स असं म्हणाल्याचं शक्ती सिंह यांना सांगितलं. त्यानंतर मॅचरेफरी यांनी आपली चूक दुरुस्त केली. यामुळे नितीश राणा आधी नाराज झालेला. पण नंतर सर्व गैरसमज दूर झाला.
दरम्यान यानंतर फॅफने टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेणार याबाबत संवाद साधत होता. यावेळेस “कदाचित एक्सेंटमुळे हा गोंधळ झाला असावा”, असं फाफ संजय मांजेरकर यांना म्हणाला. या सर्व गडबड गोंधळाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.
टॉसदरम्यान मोठी गडबड
RCB have won the toss and have opted to field first at Eden Gardens! #KKRvsRCB #EdenGardens #IPL2023pic.twitter.com/TUK1whygpm
— OneCricket (@OneCricketApp) April 6, 2023
दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. आरसीबीने रीस टोपली याच्या जागी डेव्हिड विली याला संधी दिली आहे. तर केकेआरने अनूकुल सिंग याच्या जागी सुयश शर्मा याचा समावेश केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.