Yuzvendra Chahal | शानदार, जबरदस्त! युझवेंद्र चहल याचा आयपीएलमध्ये महारेकॉर्ड, काय केलंय माहितीये?
युझवेंद्र चहल याने आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलंय. पण राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने इतिहास रचलाय.
पश्चिम बंगाल | आयपीएल 16 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी कॅप्टन संजू सॅमसन याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकाताला 20 ओव्हर्समध्ये 149 धावांवरच रोखलं. राजस्थानकडून युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. चहलने यासह इतिहास रचला. चहल आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. चहने वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो याला मागे टाकत हा कीर्तीमान केला.
चहलने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या 7 मे रोजी झालेल्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. चहलने यासह ड्वेन ब्राव्होच्या सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे केकेआर विरुद्धच्या सामन्यात हा महारेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी चहलला फक्त 1 विकेटची गरज होती. चहलने केकेआर कॅप्टन नितीश राणा याला आऊट केलं. यासह चहल ब्राव्होला पछाडत सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरला.
फिरकीचा राजा युझवेंद्र चहल
Milestone ? – Yuzvendra Chahal becomes the leading wicket-taker in IPL ??#TATAIPL | @yuzi_chahal pic.twitter.com/d70pnuq6Wi
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
युझवेंद्र चहल – 187
ड्वेन ब्रावो – 183
पीयूष चावला – 174
अमित मिश्रा – 172
आर अश्विन – 171
चहलने केकेआरच्या एकूण 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये कॅप्टन नितीश राणा, वेंकटश अय्यर, शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह या 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. चहलने 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 25 धावा देत या विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे चहलने 24 पैकी 11 बॉल हे डॉट टाकले. तसेच चहलने यासह पर्पल कॅप सुद्धा पटकावली. पहिल्या डावातील ब्रेकनंतर सहकारी शिमरॉन हेटमायर याने चहलला कॅप दिली.
चहलची पहिली प्रतिक्रिया
“असा विक्रम कधी करेन असं वाटलं नव्हतं. क्रिकेट करिअरमध्ये फार चढउतार आले. मात्र या चढउतारातूनच आपण शिकतो”, अशी प्रतिक्रिया चहलने पहिल्या डावानंतर दिली.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.