Kohli vs Gambhir: भांडणाच्या पाच दिवसानंतर विराट कोहली अ‍ॅक्शन मोडमध्ये, बीसीसीआय अधिकाऱ्यांना सांगितल की…

आयपीएल 2023 साखळी फेरीतलील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील दोन्ही सामने संपले आहेत. मात्र असं असलं तरी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाही.

Kohli vs Gambhir: भांडणाच्या पाच दिवसानंतर विराट कोहली अ‍ॅक्शन मोडमध्ये, बीसीसीआय अधिकाऱ्यांना सांगितल की...
Kohli vs Gambhir ये झगडा खत्म क्यों नहीं होता..! पाच दिवसानंतर विराट कोहलीने काढलं अस्त्र, बीसीसीआय अधिकाऱ्यांना म्हणाला..
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 2:38 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील रंगत एका बाजूला आणि विराट-गंभीर आणि विराट-गांगुली वाद हा दुसऱ्या बाजूला. सध्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद ताजा आहे. सोशल मीडियावर या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना संपल्यानंतर गंभीर-विराट भिडले होते. हा वाद अफगाणिस्तानचा खेळाडू असलेल्या नवीन उल हकमुळे वाढला होता. या वादानंतर बीसीसीआयने कोहली आणि गंभीर विरोधात सामना फीसच्या 100 टक्के रक्कम, तर नवीन वर सामन्याच्या 50 टक्के रक्कम भरण्याचा दंड ठोठावला होता.

पाच दिवसानंतर विराट कोहलीने आपलं अस्त्र काढलं आहे. बीसीसीआयला लेटर लिहित सांगतिल आहे की, माझी यात कोणतीच चूक नव्हती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कोहलीने सांगितलं आहे की, भांडणात गौतम गंभीर आणि नवीन असं काहीच बोललो नाही की इतका दंड ठोठावला जाईल. बीसीसीआयने त्याच्या सामना फीमधली पूर्ण रक्कम कापू नये. त्याचबरोबर विराट कोहलीने नवीन उल हकची तक्रार देखील केली आहे.

गंभीर आणि विराटला किती दंड ठोठावला

विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या वादाला कारणीभूत ठरले. बीसीसीआयने या प्रकरणी तिघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी दंडात्मक कारवाई म्हणून कोहलीला 100 टक्के सामना फी भरण्याचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच 1.07 कोटी रुपये भरावे लागतील. तर गौतम गंभीरला 100 टक्के सामना फी म्हणजेच 25 लाख रुपये भरायचे आहेत.

गंभीर आणि कोहलीकडून 2.21 या नियमाचं उल्लंघन

आयपीएल स्पर्धेतील सामन्यात खेळाडूंकडून गैरवर्तन होऊ नये यासाठी बीसीसीआयने नियमावली तयार केली आहे. सामन्यात एखाद्या खेळाडूने उल्लंघन केलं तर या नियमांतर्गत कारवाई केली जाते. विराट आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेची दखल बीसीसीआयने घेतली आणि नियम 2.21 नुसार कारवाई केली.

काय आहे आयपीएल नियम 2.21

आयपीएल कोड ऑफ कंडक्टमधील 2.21 हा नियम खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वादामुळे खेळाचं नाव खराब झाल्यास हा नियम लागू होतो. विराट आणि गंभीर वादामुळे असंच काहीसं झालं आहे. या नियमांतर्गत जाणीवपूर्वक डिवचणे, अश्लिल टिका करणे यांचा समावेश आहे. भर मैदानात विचित्र कृती करणे यात नमूद आहे.

'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.