MI vs LSG IPL 2023 : स्टोईनिसमुळे मुंबईचं स्वप्न भंगलं, आता प्लेऑफसाठी शेवटच्या विजयासह जर तरच गणित

आयपीएल 2023 स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे.

MI vs LSG IPL 2023 : स्टोईनिसमुळे मुंबईचं स्वप्न भंगलं, आता प्लेऑफसाठी  शेवटच्या विजयासह जर तरच गणित
MI vs LSG IPL 2023 : मुंबईला लखनऊने तिसऱ्यांदा पाजलं पराभवाचं पाणी, स्टोईनिसमुळे प्लेऑफचं गणित फिस्कटलं
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:51 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबईला धावांनी पराभूत केलं. लखनऊने 20 षटकात 3 गमवून 177 धावा केल्या आणि विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईचा संघ 20 षटकात गडी गमवून 172 धावा करू शकला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्सचं प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. लखनऊला एका अंकांचा प्लेऑफमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे

मुंबईचा डाव

लखनऊ सुपर जायंट्सने विजसाठी दिलेले 178 धावांचं आव्हान मुंबईला गाठता आलं नाही. रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. मात्र संघाला सेफ झोनमध्ये आणण्यास दोघांना अपयश आलं. रवि बिश्नोईच्या षटकावर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. त्याने 25 चेंडूत 37 धावा केल्या. इशान किशनने 39 चेंडूत 59 धावा करत बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवही काही खास करू शकला नाही. 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला.

नेहल वढेराची बॅट काही हवी तशी चालली नाही 20 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतला. टीम डेविडने विजयाच्या पाठलाग करताना चांगली खेळी केली. मात्र विजयी लक्ष्य काही गाठता आलं नाही. शेवटच्या षटकात 11 धावा करता आल्या नाहीत.

लखनऊचा डाव

आयपीएल 2023 स्पर्धेतील महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर सलग दोन धक्के लखनऊला बसले. दीपक हुड्डा आणि प्रेरक मांकड या दोघांना तंबूत पाठवलं. त्यानंतर क्विंटन डिकॉकही काही खास करु शकला नाही. 16 धावा करून तंबूत परतला.

त्यानंतर कर्णधार कृणाल पांड्या आणि मार्कस स्टोइनिसने डाव सावरला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर दुखापत झाल्याने कृणाल पांड्या रिटायर्ट हर्ट झाला. त्याऐवजी निकोलस पूरन मैदानात उतरला.

मार्कस स्टोईनिसने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 47 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी केली. तर कृणाला पांड्या 49 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.