Wtc Final आधी टीम इंडियासाठी मोठी बातमी, जयदेव उनाडकटच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. त्याआधी टीममधी एका खेळाडू हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
मुंबई | आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. तर दिल्ली कॅपिट्ल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांचा सुपडा साफ झालाय. त्यामुळे उर्वरित 3 जागांसाठी 7 संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला दुखापत झाली आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ लंडनमधील केनिंग्टनमधील द ओव्हल मैदानात हा महामुकाबला खेळणार आहेत. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान पार पडणार आहे. मात्र या सामन्याआधी जयदेव उनाडकट याच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने बदली खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्स टीममध्ये जयदेव उनाडकट याच्या जागी मुंबईच्या सूर्यांश शेडगे याचा समावेश करण्यात आला आहे. जयदेव याला सरावादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे जयदेव याला बाहेर पडावं लागलं. तर जयदेव याला झालेली दुखापत सूर्यांश याच्या पथ्यावर पडली आहे.
सूर्यांश शेडगे याच्याबाबत थोडक्यात
सूर्यांश शेडगे याचा टीममध्ये 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये समावेश करण्यात आला आहे. सूर्यांशचं अजून फर्स्ट क्लास डेब्यू झालेलं नाही. मात्र सूर्यांशने जाईल्स शील्ड ट्रॉफीत वेगवान त्रिशतक ठोकलं आहे. सूर्यांशने 7 वर्षांआधी गुंडेजा एजुकेशन अकादमीकडून (कांदिवली) एसपीएसएस मुंबादेवी निकेतन विरुद्ध खेळताना 137 बॉलमध्ये 326 धावांची विस्फोटक खेळी केली होती. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आता सूर्यांशला शेवटच्या टप्प्यात आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे. मात्र त्यानंतरही सूर्यांश या संधीचं सोनं कसं करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
सूर्यांश शेडगे याची एन्ट्री
? NEWS ?
Suryansh Shedge replaces injured Jaydev Unadkat at @LucknowIPL. #TATAIPL
Details ? https://t.co/5Bxsx0Yot7
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2023
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान कायल मेयर्स, यश ठाकूर, कृष्णाप्पा गोतम, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक, अमित मिश्रा, आवेश खान, अर्पित गुलेरिया, करुण नायर, मनन वोहरा, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, सूर्यांश शेडगे आणि करण शर्मा.