LSG vs GT | गुजरातचा ऐन क्षणी थरारक विजय, लखनऊचा 7 धावांनी पराभव
लखनऊ सुपर जायंट्स टीमला आजचा दिवस ठरवूनही विसरला येणार नाही. अशाप्रकारे कोणती टीम पराभूत होईल, असं कोणत्याही क्रिकेट चाहता स्वप्नात विचा करु शकणार नाही. लखनऊने क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड केलाय.
लखनऊ | लखनऊ सुपर जायंट्स टीमने जिंकलेला सामना ऐन क्षणी गमावला. लखनऊने जवळपास सामना जवळपास जिंकला होता. पण गुजरातने लखनऊला अखेरच्या काही ओव्हरमध्ये झटपट धक्के देत सामना फिरवला. गुजरातने विजयासाठी लखनऊला 136 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊ ही आव्हानाच्या जवळपास पोहचली होती. कॅप्टन केएल राहुल याने ठोकलेल्या अर्धशतकामुळे लखनऊ निश्चित होती. मात्र ऐन क्षणी घात झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी अखेरीस लखनऊच्या झपाझप विकेट्स घेतल्या.
ऐन क्षणी केएल राहुल, मार्क्स स्टोयनिस, आयुष बदोनी आणि दीपक हुड्डा हे भरोशाचे फलंदाज झटपट आऊट झाले. त्यामुळे घात झाला. गुजरातने सामन्यात कमबॅक केलं आणि लखनऊच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला. गुजरातने लखनऊला 136 धावा करण्यापासून रोखलं. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर लखनऊला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 128 धावाच करता आल्या.
गुजरातकडून कॅप्टन केएल राहुल याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. कायले मेयर्स आणि कृणाल पंड्या या दोघांनी अनुक्रमे 24 आणि 23 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर दगाफटका झाला. आक्रमक निकोलस पूरन 1, आयुष बदोनी 8, मार्क्स स्टोनिस 0 आणि दीपक हुड्डा 2 असे आऊट झाले. प्रेरक मंकड आणि रवि बिश्नोई हे दोघे नाबाद राहिले. तर गुजरातकडून मोहित शर्मा आणि नूर मोहम्मद या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर राशिद खानने 1 विकेट घेतली.
गुजरातची बॅटिंग
त्याआधी गुजरात टायटन्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. गुजरातकडून कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऋद्धीमान साहा याने 37 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 47 धावा जोडल्या. त्याशिवाय इतर फलंदाजांना छाप सोडता आली नाही.
शुबमन गिल शून्यावर आऊट झाला. अभिनव मनोहर 3 रन्स करुन बाद झाला. विजय शंकर याने 10 धावांचं योगदान दिलं.डेव्हिड मिलर याने 6 धावा केल्या. तर राहुल तेवतिया 2 धावांवर नाबाद राहिला. लखनऊकडून कृणाल पंड्या आणि मार्क्स स्टोयनिस या दोघांनी 2 विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक आणि अमित मिश्रा या दोघांननी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), रिद्धिमान साहा, शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद आणि मोहित शर्मा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बदोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.