IPL 2023 LSG vs MI Live Streaming | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत, कोण जिंकणार?
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Streaming | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांची आमनेसामने येण्याची ही आयपीएल 2023 मधील पहिलीच वेळ आहे.
लखनऊ | आयपीएल 16 व्या मोसमात आता प्लेऑफ क्वालिफायसाठी दिल्ली कॅपिट्ल्सचा अपवाद वगळता उर्वरित 9 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. या सिजनमध्ये 61 सामन्यांनंतरी एकही संघाला क्वालिफाय करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे क्वालिफायसाठी चुरस पाहायला मिळत आहे. या पर्वात मंगळवारी 16 मे रोजी 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स यांच्या विरुद्ध होणार आहे.
ताज्या आकडेवारीनुसार मुंबई 7 विजय आणि 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊच्या नावावर 13 पॉइंट्स आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अटीतटीचा असा आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामना कधी कुठे?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 16 मे रोजी खेळवला जाणार आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामना कुठे?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
सामना किती वाजता सुरु होणार?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे बघता येईल?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
डिजीटल स्ट्रिमिंगचं काय?
क्रिकेट चाहत्यांना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच मोबाईल किंवा लॅपटॉपवर जिओ सिनेमा एपच्या मदतीने पाहता येईल.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.