IPL 2023 | सनरायजर्स हैदराबाद टीमला 13 कोटी 25 लाख रुपयांचा चुना
आयपीएलच्या 16 व्या मोसमाचं आयोजन हे भारताती विविध 12 शहरांमध्ये करण्यात आलं आहे. आतापर्यंत यशस्वीपणे 9 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र आता सनराजयर्स हैदराबाद टीमची 13 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
लखनऊ | आयपीएल 16 व्या मोसमातील 10 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडिममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात नेदरलँड विरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर एडन मार्करमने हैदराबादची नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घेतली आहे. या सामन्यादरम्यान हैदराबादची मोठी फसवणूक झाली आहे. हैदराबादला तब्बल 13 कोटी 25 लाख रुपयांचा चूना लावण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सर्वांसमोर ऑन कॅमेरा घडला आहे. या सर्व फसवणुकीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सनराजयर्स हैदराबादने या सामन्यात टॉस जिंकला. कॅप्टन एडन मार्करम याने बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबाजने आपल्या चाहत्यांची सपशेल निराशा केली. हैदराबादला एकूण बॉलपेक्षा फक्त 1 जास्त धाव करता आली. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये म्हणजेच 120 बॉलमध्ये 8 विकेट्स गमावून 121 धावा केल्या.
हैदराबादकडून राहुल त्रिपाठी याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. अनमोलप्रीत सिंह याने 31 रन्सचं योगदान दिलं. अब्दुल समद याने नाबाद 21 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने 16 रन्स जोडल्या. कॅप्टन मार्करम झिरोवर आऊट झाला. मयंक अग्रवाल याने 8 रन्स केल्या. आदिल रशीदने 4 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. उमरान मलिक यालाही भोपळाही फोडता आला नाही. तर भुवनेश्वर कुमार शून्यावर नाबाद परतला.
लखनऊकडून कृणाल पंड्या याने 3 फलंदाजांना आऊट केलं. अमित मिश्राने 2 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकूर आणि रवि बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हैदराबादची 13 कोटींची फसवणूक
दरम्यान हॅरी ब्रूक याने हैदराबादकडून खेळताना 4 बॉलमध्ये 3 धावा केल्या. यानंतर हॅरी आऊट झाला. ब्रूक याची बेस प्राइज ही 1 कोटी 50 लाख रुपये इतकी होती. मात्र हैदराबादने या खेळाडूची मागील काही सामन्यांमधील कामगिरी पाहता त्याला आपल्या ताफ्यात घेण्याचं ठरवल.
ब्रूकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांनीही पसंती दाखवत बोली लावली होती. मात्र हॅरीसाठी हैदराबादने 13 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं. मात्र हॅरीला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात आपला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
हॅरी ब्रूक आऊट
तसेच हॅरीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातही फक्त 13 धावाच केल्या होत्या. मात्र हॅरीने दोन्ही सामन्यात टीमची निराशा केली. त्यामुळे एका अर्थान हॅरीने टीमची फसवणूक केल्याचं म्हटलं जात आहे. यामुळेच हैदराबादला 13 कोटी 25 लाख रुपयांचा चूना लागल्याचं म्हटलं जात आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट आणि रवि बिश्नोई.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक आणि आदिल रशीद.