महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड कपमधील ‘त्या’ सिक्ससाठी सन्मान, नेटकऱ्यांकडून गौतम गंभीर याची ‘फिरकी’
महेंद्रसिंह धोनी याने वानखेडे स्टेडियमवर 11 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात विनिंग सिक्स खेचला होता.तो सिक्स ज्या जागेवर पडला त्या जागेवर धोनीचा सन्मान करण्यात आला.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 8 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी चेन्नईची टीम काही दिवसांपूर्वीच स्टेडियममध्ये येऊन पोहचली आहे. टीम इंडियाने 2011 मध्ये 28 वर्षांनंतर महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. धोनीने विजयी सिक्स ठोकला होता. त्यासाठी आता 11 वर्षांनी धोनीचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. यावरुन नेटकऱ्यांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या गौतम गंभीर याच्यावर विनोदी मिम्स शेअर करण्यात आले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून धोनीचा सन्मान सत्कार करण्यात आला. धोनीने मारलेला तो सिक्स ज्या ठिकाणी जाऊन पडला होता, त्या खूर्चीवर एमसीए स्टॅचू बनवणार आहे. यासाठी धोनीच्या हस्ते या भुमीपूजन करण्यात आलं. धोनीने लाल फीत कापत उद्घाटन केलं. एमसीएने धोनीच्या केलेल्या सत्कारामुळे गंभीरच्या जुन्या जखमेवर नव्याने मीठ लावण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
व्हायरल मीम
वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीर आणि धोनी या दोघांनी 90 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. टीम इंडिया अडचणीत होती, तेव्हा गंभीरने एक बाजू धरुन ठेवली होती. गंभीरने त्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची खेळी केली. तर धोनीने अखेरीस सिक्स ठोकत भारताला विजयी केली. धोनीने नाबाद 91 धावा केल्या. धोनीच्या या सिक्सचीच सर्वत्र चर्चा झाली. मात्र गंभीर आणि इतर खेळाडूंकडे दुर्लक्ष झालं. यामुळे तेव्हापासून गंभीर धोनीवर खार खाऊन असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.
धोनीने सर्वांच श्रेय घेतल्याची चर्चा सुरु झाली. धोनीलाच वर्ल्ड कप हिरो ठरवण्यात आलं. आपल्याला श्रेय न मिळाल्याची खंत गंभीरला अजूनही आहे. त्यात आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या सिक्ससाठी धोनीचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे गंभीरच्या जखमेवर मीठ लावण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. मुंबईला या मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नईनेही पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना जिंकला. त्यामुळे मुंबईचा आपल्या होम ग्राउंडवर कट्टर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करुन पहिला विजय विजय नोंदवण्याचा प्रयत्न असणार आहे.