IPL 2023 स्पर्धेतच महेंद्रसिंह धोनीचा मोठा निर्णय, चेपॉक मैदानात प्रेक्षकांसमोर निवृत्तीबाबत स्पष्टच सांगितलं
आयपीएल इतिहासात महेंद्रसिंह धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून समोर आला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही धोनीचा संघ चांगली कामगिरी करत आहे. चेन्नईने सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार वळणावर येत आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ जेतेपदावर नाव कोरेल यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक संघाचे चाहते आपलाच संघ विजेता होणार असा दावा देखील करत आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत नवनव्या विक्रमांची नोंद देखील होत आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 29 सामने झाले आहेत. सनराईजर्स हैदराबाद यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. 7 गडी राखून हैदराबाद विरुद्ध विजय मिळवला. मात्र हा सामना संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने मोठा खुलासा केला आहे.
“हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा टप्पा आहे. मी त्याचा आनंद घेताना खूप खूश आहे. दोन वर्षानंतर चाहत्यांना मैदानात येण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. तसेच आत्मयिता दाखवली आहे. मला ऐकण्यासाठी ते उशिरा मैदाना सोडतात.”, असं सांगत महेंद्रसिंह धोनीने निवृत्तीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महेंद्रसिंह धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असू शकते.
“फलंदाजी करण्याची तितकी संधी मिळाली नाही. पण मला याबाबत काहीच तक्रार नाही. मी दव पडेल की नाही याबाबत संभ्रमात होतो आणि गोलंदाजीचा निर्णय घेण्यापूर्वी संभ्रमात होतो. पण गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं.” असंही महेंद्रसिंह धोनी याने सांगितलं.
“त्यांनी मला बेस्ट कॅचचा अवॉर्ड दिला नाही (हसत हसत), पण हा बेस्ट कॅच होता. काही वर्षांपूर्वी राहुल द्रविड किपिंग करताना त्याने असा कॅच पकडला होता. तुम्ही कितीही वयस्कर व्हा पण त्यापासून दूर जाऊ शकत नाही.”, असंही महेंद्रसिंह धोनीने सांगितलं.
2008 ते 2015 या काळात धोनी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी लागल्याने 2016 ते 2017 या दोन पर्वात रायझिंग पुणे सुपरजायन्ट संघाकडून खेळला. त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या हाती आली. महेंद्र सिंह धोनीचं हे 16 वं पर्व आहे. त्यात धोनीचं वय 41 वर्षे असून 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यानंतर आतापर्यंत धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.