Arjun Tendulkar, MI vs CSK | अर्जुन तेंडुलकर चेन्नई विरुद्ध पदार्पण करणार ; त्या फोटोमुळे मार्ग मोकळा?

| Updated on: Apr 07, 2023 | 6:14 PM

आयपीएलमधील 16 व्या मोसमातील 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. अर्जुन तेंडुलकर या सामन्यातून पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Arjun Tendulkar, MI vs CSK | अर्जुन तेंडुलकर चेन्नई विरुद्ध पदार्पण करणार ; त्या फोटोमुळे मार्ग मोकळा?
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात ही पराभवाने झाली. मुंबईने यासह 2013 पासूनची पहिल्या सामन्यातील पराभवाची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबईला आरसीबीने पराभूत केलं होतं. आता मुंबई 8 एप्रिल रोजी या मोसमातील दुसरा सामना आपल्या होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. मुंबई या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी मोसमातील पहिला सामना गमावला आहे. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. त्यामुळे चेन्नईचा हा तिसरा आणि मुंबईचा हा दुसरा सामना असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघ या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये कसून सराव करत आहेत. मुंबई इंडियन्स टीमचा मेन्टॉर सचिन तेंडुलकर याचा मुलगा हा गेल्या 2 वर्षांपासून पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. अर्जूनचं आयपीएलमधील मुंबई इंडियन्ससाठीचं हे तिसरं वर्ष आहे. मात्र त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नाही. मात्र अर्जुन चेन्नई विरुद्ध मैदानात उतरु शकतो, असा कयास बांधला जात आहे. मुंहबई इंडियन्सने शेअर केलेल्या एका फोटोमुळे अर्जुनचं डेब्यू निश्चित मानलं जात आहे.

मुंबई इंडियन्सने अर्जुनचा बॉलिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘अर्जुनला फक्त निशाणा दिसतो’ अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. मुंबईने अर्जुनला 2021 मध्ये 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये आणखी 10 लाख मोजून एकूण 30 लाख रुपयात आपल्यातच कायम ठेवलं. त्यामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमात तरी संधी दिली जाईल, असं म्हटलं जात होतं. मात्र अर्जुनचा वेटिंग पीरियड हा आणखी एका वर्षाने वाढला.

अर्जुनचं मुंबईत तिसरं वर्ष सुरु झालंय. मात्र संधी काही मिळालेली नाही. यामुळे आता अर्जुनला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात होम ग्राउंडमध्येच डेब्यू करण्याची संध मिळणार का , याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.