IPL 2023 | आयपीएलमधून Rohit Sharma याची तडकाफडकी माघार?

रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला तब्बल 5 वेळा विजयी केलंय. मात्र एका फोटोमुळे रोहितने आयपीएलमधून निवृत्ती घेतली की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

IPL 2023 | आयपीएलमधून Rohit Sharma याची तडकाफडकी माघार?
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:00 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाची तयारी पूर्ण झालीय. या मोसमाची सुरुवात 31 मार्च अर्थात काही तासांनी होणार आहे. मोसमातील पहिला सामना हा गतविजेत्या गुजरात विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्याआधी ओपनिंग सेरमनी होणार आहे. याआधी कोरोनामुळे रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे यंदा दणक्यात कार्यक्रम होणार आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएलला रामराम केलाय की काय अशी चर्चा रंगलीय. त्यामागचं कारणही तसंच आहे.

नक्की काय झालंय?

लोकप्रिय टी 20 लीगच्या सुरुवातीआधी सर्व कर्णधाराचं आयपीएल ट्रॉफीसोबत फोटो सेशन झालं. या फोटोसेशनमध्ये सर्वं संघाचे कर्णधार दिसून येत आहेत,अपवाद रोहित शर्मा. या फोटोत रोहित दिसत नाही, किंवा मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडूही नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्मा ट्रेंड झाला आहे. तसेच रोहित कुठेय असंही विचारलं जात आहे़. मात्र रोहित या फोटोसेशनला हजर का राहिला नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.

आयपीएल ट्रॉफी आणि कर्णधार

रोहित याच्या गैरहजेरीमुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काही जणांनी तर रोहितने आयपीएलला रामराम ठोकल्याचाही अंदाज बांधलाय.

मुंबई इंडियन्स यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

‘हिटमॅन’ यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.

दरम्यान मुंबई इंडियन्स या मोसमातील आपला पहिला सामना हा 2 एप्रिल रोजी खेळणार आहे. या सामन्यात मुंबईची बंगळुरु विरुद्ध फाईट होणार आहे.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस आणि जोफ्रा आर्चर .

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.