मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमाचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 10 संघाची विभागणी ही ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. या हंगामाती सर्व सामन्यांचं आयोजन हे देशातील एकूण 12 स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. तसेच मोसमातील सलामीचा सामना हा गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या निमित्ताने आपण मु्ंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
मुंबई या मोसमातील आपला सलामीचा सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
2 एप्रिल, विरुद्ध बंगळुरु , संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, बंगळुरु.
8 एप्रिल, विरुद्ध चेन्नई , संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, मुंबई.
11 एप्रिल, विरुद्ध दिल्ली, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, दिल्ली.
16 एप्रिल, विरुद्ध कोलकाता, दुपारी 3. 30 मिनिटांनी, मुंबई.
18 एप्रिल, विरुद्ध हैदराबाद, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, हैदराबाद.
22 एप्रिल, विरुद्ध पंजाब, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, मोहाली.
25 एप्रिल, विरुद्ध गुजरात, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी.
30 एप्रिल, विरुद्ध राजस्थान, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, मुंबई.
3 मे, विरुद्ध पंजाब, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, मोहाली.
6 मे, विरुद्ध चेन्नई, दुपारी 3. 30 मिनिटांनी, एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.
9 मे, विरुद्ध बंगळुरु,संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, मुंबई.
12 मे, विरुद्ध गुजरात,संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, मुंबई.
16 मे, विरुद्ध लखनऊ,संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी.
21 मे, विरुद्ध हैदराबाद,दुपारी 3. 30 मिनिटांनी, मुंबई.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.
आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी ‘पलटण’ तयार
काय पलटन? होऊन जाऊ दे मग? ??
Which game are you looking forward to in our #TATAIPL 2023 campaign?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #IPL2023 pic.twitter.com/oPxi95rNCf
— Mumbai Indians (@mipaltan) February 17, 2023
रोहित आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.