Mi vs CSk : वानखेडेवर अजिंक्य रहाणेचं वादळ, सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करत रचला इतिहास
मुंबईकर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला. रहाणेने आपला दांडपट्टा चालू केला आणि षटकार आणि चौकार मारत इतिहास रचला आहे.
मुंबई : मुंबई इंडिअन्स वि.चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यामध्ये मुंबईने 158 धावांचं लक्ष्य दिलं आहे. चेन्नईने या लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली आहे. डेव्हॉन कॉनवे शून्यावर बाद झाल्यावर मुंबई मॅचमध्ये परतली असं वाटलं होतं. मात्र मुंबईकर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला. रहाणेने आपला दांडपट्टा चालू केला आणि षटकार आणि चौकार मारत इतिहास रचला आहे.
अजिंक्य रहाणेने यंदाच्या पर्वातील सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. आलेल्या अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी केली. त्याने 19 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकलं. तर 27 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. रहाणेनंतर जोस बटलर आणि शार्दुल ठाकुरने 20 चेंडूंमध्ये अर्धशतके केली आहेत.
आयपीएलच्या इतिहासामध्ये सीएसकेसाठी सर्वात वेगवान आयपीएल अर्धशतक करणाऱ्या यादीमध्ये रहाणेने दुसरं स्थान मिळवलं आहे. सुरेश रेनाने 16 चेंडूत 2021 साली वानखेडे स्टेडिअममध्येच पंजाबविरूद्ध सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर आता अजिंक्य रहाणेने 19 चेंडूत जागा स्थान मिळवलं आहे. तिसऱ्या स्थानी मोईन अली असून त्याने राजस्थानविरूद्ध 19 चेंडूत 2022 साली अर्धशतक केलं होतं.
महेंद्र सिंह धोनी चौथ्या क्रमांकावर असून त्याने 20 चेंडूत मुंबई विरूद्धच 2012 साली अर्धशतक केलं होतं. तर पाचव्या स्थानी अंबाती रायडू असून त्यानेही मुंबई विरूद्धच फिरोजशहा कोटला मैदानावर अर्धशतक केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ