MI vs CSK : रोहित शर्मा याने अखेर ती गोष्ट मान्य केलीच, पराभवाबाबत केलं मोठं वक्तव्य
सामना हरल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहितने नेमका कोणत्या कारणांमुळे मुंबईच्या हातातून हा सामना गेला याबाबत सांगितलं आहे.
मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यामध्ये मुंबईचा 7 विकेट्सने पराभव झाला आहे. मुंबईचा या पराभवासह यंदाच्या पर्वातील दुसरा पराभव झाला आहे. सामना हरल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहितने नेमका कोणत्या कारणांमुळे मुंबईच्या हातातून हा सामना गेला याबाबत सांगितलं आहे.
मुंबईच्या पराभवावर काय म्हणाला रोहित?
आम्ही मध्येच चाचपडलो, मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा काहीच उपयोग करता आला नाही. आम्हाला 30-40 धावा कमी पडल्या आणि मधल्या षटकांचा फायदा घेता आला नाही. सीएसकेच्या फिरकीपटूंना श्रेय द्यावे लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला दडपणाखाली ठेवले. आमच्याकडे काही युवा खेळाडू आहेत आणि त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल कारण त्यांच्याकडे प्रतिभा असल्याचं म्हणत रोहित संघातील युवा खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला. आता फक्त दोन सामने झाले आहेत त्यामुळे आम्ही नव्याने सुरुवात करू, असंही रोहित शर्मा याने म्हटलं आहे.
मुंबई संघाने एकदम झकास सुरूवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चौकार षटकार मार आक्रमक सुरूवात करून दिली होती. रोहितला तुषार देशपांडेने बोल्ड आऊट केलं. त्यानंतर ईशान बाद झाला आणि मुंबईचं गणित बिघडलं. मुंबईचा यंदाच्या पर्वातील हा सलग दुसरा पराभव आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे