MI vs CSK, IPL 2023 | मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यावर पावसाचं सावट?
आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यावरही पावसाचं सावट होतं. अहमदाबादमध्ये पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला 30 मार्च रोजी जोरदार पाऊस झाला होता.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 8 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला आणि एकूण 11 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा म्हणजेच 12 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा सामना आयपीएलमधील सर्वात यशस्वी दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स आपल्या होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईला होम क्राउड आणि होम कंडीशनचा मोठा फायदा होणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण वेदर रिपोर्ट जाणून घेणार आहोत.
मुंबई-चेन्नई सामन्यावर पावसाचं सावट?
या सामन्यात हवामानाची मोठी भूमिका असणार आहे. कारण मुंबईतील लहरी वातावरण आणि हवामानाचा अंदाज प्रत्येकाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता नाही. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. मात्र ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मुंबई इंडियन्स टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
आयपीएल 2023 साठी टीम सीएसके
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.