मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये शुक्रवारी सामना रंगणार आहे. गुजरातसाठी हा सामना म्हणजे प्ले-ऑफचं तिकीट फायनल करणारा आहे. मुंबई इंडिअन्सने विजय मिळवला तर परत एकदा तिसऱ्या स्थानी जाणार आहे. शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकमेकांशी भिडले तेव्हा टायटन्सने 55 धावांनी विजय मिळवला होता.
हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तंस पाहायला गेलं तर वानखेडेच्या खेळपट्टीने संपूर्ण हंगामात बॅटींगला पूरक ठरली आहे. सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि नेहल वढेरा यांची खेळी या मैदानावर पाहायला मिळाली होती. शेवटच्या सामन्यामध्ये मुंबईने आरसीबीचा आणि गुजरातने लखनऊ संघाचा पराभव केला होता.
गुजरात संघ आधापासूनच फॉर्ममध्ये आहे तर दुसरीकेडे मुंबईची धुरा सर्व फलंदाजांवर अवलंबून आहे. पलटणकडून संपूर्ण स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. मात्र मजबूत पक्ष असलेली फलंदाजी फॉर्ममध्ये आल्याने गुजरातला त्यांना रोखण्याचं आव्हान असणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई गुजरातला पराभवाचं पाणी पाजते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यष्टिरक्षक: ऋद्धिमान साहा, इशान किशन
फलंदाज: शुभमन गिल, डेव्हिड मिलर, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा
अष्टपैलू: कॅमेरून ग्रीन, हार्दिक पांड्या
गोलंदाज: राशिद खान, ख्रिस जॉर्डन, नूर अहमद
कर्णधार : शुभमन गिल किंवा सूर्यकुमार यादव
उपकर्णधार :कॅमेरून ग्रीन किंवा राशिद खान
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी