Nitish Rana | नितीश राणाकडून ऋतिक शौकिनला भर मैदानात शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल

आयपीएलसाठी आजचा काळा दिवस ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असलेल्या नितीश राणा याने मुंबई इंडियन्सत्या गोलंदाजाला उघडउघड सर्वांसमोर शिव्या दिल्या आहेत. पाहा व्हीडिओ

Nitish Rana | नितीश राणाकडून ऋतिक शौकिनला भर मैदानात शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 7:08 PM

मुंबई | आयपीएल 2023 मध्ये 22 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यादरम्यान कोलकाताने मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र या सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाज ऋतिक शौकीन यांच्या दोघांमध्ये हमरीतुमरी झालेली दिसून आली. या हमरीतुमरीत नितीश राणा याने हद्दच केली. नितीशने ऑन कॅमेरा सर्वांसमोर ऋतिक शौकीन याला शिवी दिली. नितीनने शिव्या दिल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की काय झालं?

ऋतिक शौकीन कोलकाताच्या डावातील नववी ओव्हर टाकायला आला. ऋतिकच्या पहिल्याच बॉलवर नितीशने जोरदार फटका मारला. मात्र सबस्टीट्युड असलेल्या रमनदीप सिंह याने नितीशचा कॅच पकडला. आऊट झाल्याने नितीश चिडला. मैदानातून बाहेर जाताना ऋतिक आणि नितीश या दोघांमध्ये बोलाचाली झाली. मात्र यानंतर नितीश आक्रमक झालेला दिसून आला. या दोघांमध्ये हमरीतुमरी होताना पाहून मुंबईच्या खेळाडूंनी आणि पंचांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या खेळाडूंनी नितीशला समजवून मागे ओढलं. नितीशने या दरम्यान ऋतिकला उघडउघड शिव्या दिल्या.

हे सुद्धा वाचा

नितीश राणा आऊट ऑफ कंट्रोल

मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान

कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने 104 धावांची शतकी खेळी केली. वेंकटेशशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून रहमुल्लाह गुरबाज याने 8, कॅप्टन नितीश राणा याने 5, शार्दुल ठाकूर 13, रिंकू सिंह 18, आंद्रे रसेल 21* आणि सुनील नारायण याने 2* धावांची खेळी केली. तर मुंबई इंडियन्सकडून हृतिक शौकीन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दुआन जान्सेन, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकात नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.