Venkatesh Iyer | वेंकटेश अय्यर याचा वादळी शतक, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चोपला
वेंकटेश अय्यर या स्टार बॅट्समनने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी करत वानखेडे स्टेडियमवर शतक मारण्याची कामगिरी केली आहे. वेंकटेशने यासह इतिहास रचला आहे.
मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स टीमचा सलामी फलंदाज आणि युवा वेंकटेश अय्यर याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वेंकटेश अय्यर याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकत मोठा कारनामा केला आहे. वेंकटेश अय्यर याने 49 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. अय्यरचं हे वैयक्तिक पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच या हंगामात वेंकटेश हॅरी ब्रूक याच्यानंतर शतक ठोकणारा दुसराच फलंदाज ठरला. हैदराबाजच्या हॅरी ब्रूक याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हे शतक ठोकलं होतं.
केकेआरसाठी 15 वर्षांनंतर शतक
वेंकटेशने या शतकी खेळीत चौकारांपेक्षा षटकार अधिक ठोकले. वेंकटेनेश 49 चेंडूत 9 गगनचुंबी सिक्स आणि 5 रंपाट चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. वेंकटेश यासह केकआरसाठी तब्बल 15 वर्षांनंतर शतक ठोकणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. केकेआरसाठी पहिलवहिलं शतक आयपीएलच्या पहिल्या मोसमातील पहिल्याच सामन्यात ब्रँडन मॅक्युलम याने ठोकलं होतं. ब्रँडनने रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध ही शतकी खेळी केली होती.
वेंकटेश अय्यर याचं शतक
? ?
Take a bow, @venkateshiyer ?
Follow the match ▶️ https://t.co/CcXVDhfzmi#TATAIPL | #MIvKKR | @KKRiders pic.twitter.com/sYx4kSnRdT
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
वेंकटेशने शतक ठोकल्यानंतर केकेआरला त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. केकेआरला 200 पेक्षा जास्त धावा करण्याची संधी होती. मात्र वेंकटेश आऊट झाला. वेंकटेशने 51 बॉलमध्ये 6 फोर आणि 9 सिक्ससह 104 धावांची खेळी केली. वेंकटेशनची ही आयपीएलमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली.
मुंबईला 186 रन्सचं टार्गेट
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने 104 धावांची शतकी खेळी केली. वेंकटेशशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून रहमुल्लाह गुरबाज याने 8, कॅप्टन नितीश राणा याने 5, शार्दुल ठाकूर 13, रिंकू सिंह 18, आंद्रे रसेल 21* आणि सुनील नारायण याने 2* धावांची खेळी केली.
तर मुंबई इंडियन्सकडून हृतिक शौकीन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दुआन जान्सेन, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली चांगली कामगिरी केली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.