IPL 2023 MI vs LSG Eliminator : ‘मला आधीच माहित होतं…’; स्टार खेळाडू आकाश मधवालबाबत रोहित शर्मा याचं मोठं वक्तव्य!

आकाश मधवाल याने सर्वाधिक पाच विकेट्स घेत खऱ्या अर्थाने तो विजयाचा शिल्पकार ठरला.  पठ्ठ्याने आपल्या चमकदार कामगिरीने फक्त विजयच नाहीतर इतिहासही रचला आहे.

IPL 2023 MI vs LSG Eliminator : 'मला आधीच माहित होतं...'; स्टार खेळाडू आकाश मधवालबाबत रोहित शर्मा याचं मोठं वक्तव्य!
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 11:06 AM

मुंबई : आयपीएलमधील प्ले-ऑफच्या फेरातील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडिअन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामधील झालेल्या सामन्यात मुंबईने तब्बल 81 धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून युवा गोलंदाज आकाश मधवाल याने सर्वाधिक पाच विकेट्स घेत खऱ्या अर्थाने तो विजयाचा शिल्पकार ठरला.  पठ्ठ्याने आपल्या चमकदार कामगिरीने फक्त विजयच नाहीतर इतिहासही रचला आहे. सामन्यानंतर रोहित शर्मा त्याच्याबाबत बोलताना एक गोष्ट आधीच माहित असल्याचं म्हणाला.

रोहित शर्मा काय म्हणाला?

गेली अनेक वर्षे आम्ही तेच करत आलो आहोत की जे लोकांना आमच्याकडून अपेक्षित नव्हतं मात्र आम्ही करून दाखवलं आहे. आकाश गेल्या वर्षी संघाचा एक सपोर्ट बॉलर म्हणून संघाचा भाग झाला होता. एकदा जोफ्रा उपलब्ध नव्हता तेव्हा सरावादरम्यान आकाशने त्याचं कौशल्य दाखवून दिलं. तेव्हा मला माहित होतं हा पात्र खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक खेळाडूंना मुंबई इंडियन्सनंतर भारताकडून खेळताना पाहिलं आहे. माझं काम फक्त त्यांना वातावरणाशी जुळवून देणं आहे, कारण त्यांना माहित आहे की संघासाठी खेळताना त्यांचा रोल काय आहे आणि युवा खेळाडू योग्यप्रकारे पार पाडत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

रोहित भाई एकदम मस्त इन्सान है, असं आकाश मढवाल सामन्यानंतर बोलला. रोहित शर्मा नव्या खेळाडूंना त्यांना सर्व स्वातंत्र्य देऊन टाकतो. त्यांना हवी तशी फिल्डिंग असो नाहीतर फलंदाज असेल हवी तशी बॅटींग कर. टीम इंडियासाठी द्विशतक ठोकणाऱ्या इशान किशननेही सुरूवातीला रोहित भाई एकदम चील आहे, मैदानात तो मला कायम बोलतो की दडपण न घेता तुला जसं हव तसा खेळ त्यामुळे आत्मविश्वास वाढत असल्याचं किशनने सांगितलं होतं.

रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वाखाली मुंबईला तब्बल पाच वेळा चॅम्पिअन केलं आहे. यंदाच्या वर्षी आता फक्त दोन विजय आणि मुंबई सहाव्यांदा विजेतेपदावर नाव कोरणार आहे.  जर सीएसके जिंकली तर ते पाचव्यांदा चॅम्पिअन होणार आहेत. जर गुजरातने पलटणला रोखलं आणि सीएसकेलाही पराभूत केलं तर ते दुसऱ्यांदा जिंकतील.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.