Mumbai Indians : मुंबई इंडिअन्सने ‘या’ चुकांनी लखनऊविरूद्धच्या सामन्यात पराभव घेतला ओढून, जाणून घ्या!

IPL 2023 : LSG vs MI | एकेवळ सामना मुंबई सहज जिंकेल असं वाटत होतं मात्र मुंबईला या काही चुका महागात पडल्या आणि त्यांनी सामना गमावला. 

Mumbai Indians : मुंबई इंडिअन्सने 'या' चुकांनी लखनऊविरूद्धच्या सामन्यात पराभव घेतला ओढून, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:02 PM

मुंबई : मुंबई इंडिअन्स संघाचा मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून पराभव झाला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 178 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकात 172-5 धावा करू शकला. एकेवळ सामना मुंबई सहज जिंकेल असं वाटत होतं मात्र मुंबईला या काही चुका महागात पडल्या आणि त्यांनी सामना गमावला.

मुंबई इंडिअन्सची या पर्वामध्ये पहिल्यापासूनच गोलंदाजी  कमकुवत बाजू राहिली आहे. लखनऊच्या मार्कस स्टॉयनिसने शेवटच्या तीन ओव्हरमध्ये काढलेल्या धावा मुंबईला महागात पडल्या.

लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चांगली सुरूवात केली होती. दोघे मैदानावर होते त्यावेळी पलटण सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. रोहित शर्मा  आऊट झाल्यावर ईशान किशनही काही वेळातच बाद झाला.

नेहल वढेराने अर्धशतक करत संघात आपलं स्थान फिक्स केलं. पण मंगळवारी झाालेल्या सामन्यामध्ये संथ खेळी त्याने केली. याचा परिणाम असा झाला की सूर्यकुमार यादवने वाढू लागलेला रनरेट कमी करण्यासाठी आक्रमक फटके खेळायला सुरूवात केली. मात्र सुपला शॉट मारण्याच्या प्रयत्नात सूर्या बोल्ड झाला. मॅचविनर सूर्या लवकर बाद झाल्याचाही सामन्यावर परिणाम झाला.

कॅमेरून ग्रीन याला मुंबईने खूप उशिरा फलंदाजीला पाठवलं. विकेट पडत असताना मुंबईने ज्या खेळाडूला सर्वाधिक बोली लावली त्यालाचा अनकॅप खेळाडूच्या खाली खेळायला पाठवल्याने अनेकजणांना धक्का बसला. एकप्रकारे ग्रीनचं भज केल्यासारखं कधी त्याला 3 तर कधी 4, 5. नाहीतर सातव्या क्रमांकावर बॅटींगला पाठवत आहेत.

मुबंईच्या स्टार फलंदाजांना लखनऊच्या दोन बॉलर्सनी हा सामना जिंकू दिला नाही. एक म्हणजे यश ठाकूर आणि मोहसिन खान या दोघांनी मुंबईच्या हाततील सामना  काढून घेतला. सूर्याला ठाकूरनेच बोल्ड केलं, तर शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. मैदानावर कॅमेरून ग्रीन आणि  टीम डेव्हिड हे दोन दर्जेदार खेळाडू पण पठ्ठ्याने न घाबरता अवघ्या पाच धावा दिल्या. एकदम परफेक्ट यॉर्कर टाकत त्याने मोठा शॉट खेळू दिला नाही.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.