MI vs RCB Video : विराट कोहलीवर लागला अप्रामाणिकपणाचा ठपका ! का आणि कशासाठी जाणून घ्या

प्लेऑफसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात विराट कोहलीची बॅट तळपलीच नाही. अवघी एक धाव करून तंबूत परतला. आता सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे.

MI vs RCB Video : विराट कोहलीवर लागला अप्रामाणिकपणाचा ठपका ! का आणि कशासाठी जाणून घ्या
MI vs RCB Video : विराट कोहलीने पहिल्याच षटकात केली मोठी चूक, आता होतोय अप्रामाणिकपणाचा आरोप
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 09, 2023 | 10:12 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर प्लेऑफचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र विराट कोहली जेसन बेहरनडॉर्फच्या पाचव्या चेंडूवरच बाद झाला. बाद झाल्यानंतर विराट कोहली नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. कारण शॉट मारताना चूक झाली आणि चेंडू थेट विकेटकीपर इशान किशनच्या हातात गेला. मुंबईच्या अपीलनंतर पंचांनी अपील केला आणि पंचांनी आऊट दिला नाही. मात्र विराट कोहलीने तंबूत जाण्याऐवजी खेळपट्टीवर राहणं पसंत केलं. त्यानंतर रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला.

तिसऱ्या पंचांनी दिला निर्णय

मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्यानंतर रोहित शर्माने क्षणाचाही विलंब न करता रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी अल्ट्राएजचा वापर केला. तिथे बॅटला चेंडू लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. इतकंच काय बॅटला चेंडू बऱ्यापैकी घासून गेला होता. यानंतर तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं. पण यामुळे विराट कोहलीच्या खेळभावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रश्न केला आहे की, आउट आहे हे विराट कोहलीला माहिती होतं. मग अल्ट्राएजची वाट का पाहात होता. त्याने स्वत:हून मैदानातून जायला हवं होतं. यासाठी त्याने सचिन तेंडुलकरचं आदर्श घ्यायला हवा.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. यापूर्वी बंगळुरुत हे दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात बंगळुरुने विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहलीने 49 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. मुंबईने 7 गडी गमवून 171 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या बंगळुरुने 16.2 षटकात पूर्ण केलं होतं.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड