मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 30 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला आमि मोसमातील 41 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि एकूण 42 वी मॅच ही मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदा भिडणार आहेत. आयपीएल पहिला टप्पा संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने 7 पैकी 3 वेळा प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या आणि मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईने शेवटचे 2 सामने गमावले आहेत. तर राजस्थानने आपला अखेरचा सामना जिंकला आहे. या सामन्यानिमित्ताने आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना 30 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार.
मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्याचं स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.
क्रिकेट चाहत्यांना मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना जिओ एपवर मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल. विशेष म्हणजे एकूण 12 भाषांमध्ये सामन्यासह कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार), अब्दुल बसिथ, मुरुगन अश्विन, रविचंद्रन अश्विन, केएम आसिफ, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, केसी करियप्पा, युजवेंद्र चहल, डोनोवन फरेरा, शिमरोन हेटमेयर, जेसन होल्डर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, ओबेड मॅककॉय , देवदत्त पडिक्कल, रियान पराग, कुणाल सिंह राठोड, जो रूट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव आणि एडम जम्पा.