MI vs RR | मुंबई इंडियन्सने फिक्सिंग करुन सामना जिंकला? रोहितच्या त्या फोटो खळबळ

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर रविवारी 30 एप्रिल रोजी 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. हा सामना फिक्स असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केलाय.

MI vs RR | मुंबई इंडियन्सने फिक्सिंग करुन सामना जिंकला? रोहितच्या त्या फोटो खळबळ
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 4:01 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या सिजनमधील 42 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा आयपीएल इतिहासातील 1 हजारावा सामना होता. तसेच रोहित शर्मा याचा कर्णधार म्हणून 150 वा सामना होता. तर रोहितचा वाढदिवसही होता. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा सामना फार महत्त्वाचा होता आणि प्रतिष्ठेचा होता. मुंबईने हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून रोहितला बर्थडे गिफ्ट दिलं.

राजस्थानने विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 3 चेंडू राखून 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम डेव्हिड याने मुंबईला विजयासाठी 17 धावांची गरज असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जेसन होल्डरच्या बॉलिंगवर सलग 3 खणखणीत सिक्स चिपकवले. दरम्यान अशा निर्णायक सामन्यात सलग 3 सिक्स ठोकून विजय मिळवल्याने क्रीडा वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा सामना फिक्स असल्याची शंका व्यक्त केली आहे.

सामन्यात एका वेळेपर्यंत राजस्थान आणि मुंबई या दोन्ही संघांना विजयाची बरोबरची संधी होती. सूर्यकुमार यादव मधल्या फळीत जोरदार फटकेबाजी करत होता. सूर्याने 28 बॉलमध्ये 55 धावा झोडल्या होत्या. मात्र 29 व्या बॉलवर सूर्या आऊट झाला. त्यामुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. आता मुंबईला विजयासाठी 14 बॉलमध्ये 45 धावांची गरज होती.

मुंबईने 8 बॉलमध्ये 28 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा हव्या होत्या. राजस्थान कॅप्टन संजू सॅमसन याने ही निर्णायक ओव्हर जेसन होल्डर या उंचपुऱ्या गोलंदाजाला टाकायला दिली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी भुवया उंचावल्या.

सामना फिक्स असल्याची नेटकऱ्यांना शंका

मुंबईकडून स्ट्राईकवर टीम डेव्हिड होता. डेव्हिड पहिल्या 2 बॉलवर सलग 2 सिक्स ठोकले. त्यामुळे उर्वरित 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज होती. डेव्हिडने तिसऱ्या बॉलवरही सिक्स उडवला आणि मुंबईला जिंकून दिलं. यानंतर कॅप्टन रोहित शर्मा हा अंपायरसोबत बोलत होता. यामुळे हा सामना फिक्स असल्याचा संशय नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ आणि अर्शद खान.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेन्ट बोल्ट, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.