RCB vs MI Match : मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्याचा पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने मुंबई इंडियन्सवर 8 विकेट राखून विजय मिळवला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांनाच निराश केलं. मुंबई इंडियन्स टीमला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन झालं. त्यावेळी मुंबई इंडियन्सने IPL 2023 सीजनसाठी त्याला 17.50 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. पण हा खेळाडू आपल्या खराब प्रदर्शनामुळे टीमसाठी मोठा विलन ठरला.
मुंबई इंडियन्सने मोठ्या विश्वासाने ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पण हे पैसे पाण्यात जातील, असं दिसतय. मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात कॅमरुन ग्रीनच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याला तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी पाठवलं होतं. पण तो 4 चेंडूत 5 रन्स करुन आऊट झाला.
15.00 च्या इकॉनमी रेटने धावा दिल्या
RCB चा वेगवान गोलंदाज रीस टोप्लेने कॅमरुन ग्रीनला बोल्ड केलं. ग्रीन 5 रन्सवर बाद झाला. बॅटिंगनंतर त्याचा फ्लॉप शो बॉलिंगमध्ये सुद्धा कायम होता. त्याने RCB विरुद्ध गोलंदाजी करताना 2 ओव्हर्समध्ये 30 धावा दिल्या. कॅमरुन ग्रीनला एक विकेट जरुर मिळाला. पण त्याने 15.00 च्या इकॉनमी रेटने धावा दिल्या.
IPL 2023 मधील तीन महागडे खेळाडू
सॅम कुरेन (इंग्लंड) – 18.50 कोटी, पंजाब किंग्स
कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया) – 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स
बेन स्टोक्स (इंग्लंड) – 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्स
RCB समोर मुंबई इंडियन्स हतबल
मुंबई इंडियन्सला सीजनच्या पहिल्याच सामन्यात 8 विकेटने लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने शानदार विजय मिळवला. आरसीबीसमोर विजयासाठी 172 धावांच आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं होतं. कोहली 49 चेंडूत नाबाद 82 धावा, सहा फोर, पाच सिक्स आणि डुप्लेसीने 43 चेंडूत 73 धावा फटकावल्या. यात पाच फोर आणि सहा सिक्स होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. आरसीबीने 16.2 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं.