Rohit Sharma | हा स्वार्थीपणा नाही तर काय? रोहित शर्मा हैदराबादवरील विजयानंतर आरसीबीला असं काय म्हणाला?

रोहित शर्माने आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मात्र अचानक रोहित आरसीबीबाबत असं म्हणाला ज्याने त्याला स्वार्थी असं म्हटलं जातंय.

Rohit Sharma | हा स्वार्थीपणा नाही तर काय? रोहित शर्मा हैदराबादवरील विजयानंतर आरसीबीला असं काय म्हणाला?
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 10:00 PM

मुंबई | मुंबई इंडियन्स टीमने आयपीएल 16 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम राखल्या. मुंबईचा हा या हंगामातील आणि घरच्या मैदानातील म्हणजेच वानखेडे स्टेडियमवरचा अखेरचा सामना होता. हैदराबादने या सामन्यात मुंबईला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलेलं. पलटणनने हे आव्हान कॅमरुन ग्रीन याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 12 बॉल राखून आणि 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयात ग्रीनसह कॅप्टन रोहित शर्मा यानेही योगदान दिलं. रोहितने 37 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोरच्या मदतीने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. या विजयानंतर कॅप्टन रोहित काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

मुंबईने हा सामना जिंकला असला तरी, मुंबई प्लेऑफमधील पोहचणारी चौथी टीम ठरणार की नाही, हे आरसीबी विरुद्ध गुजरात या सामन्यानंतर ठरणार आहे. कारण आरसीबीने हा सामना जिंकला, तर मुंबईचा पत्ता हा नेट रनरेटमुळे साखळी फेरीतच कट होईल. त्यामुळे रोहितने विजयानंतर मुंबईने आरसीबीवर केलेल्या उपकारांची आठवण करुन दिली आहे.

रोहित शर्मा याची प्रतिक्रिया

“आम्ही जिंकण्याच्या मानसिकतेने आलो होतो. सामन्याआधी मी कुणासोबतही बोललो नाही. मुंबईचा पराभव झाला असता तर त्यासाठी आम्ही स्वत:ला जबाबदार धरलं असतं. आम्ही आरसीबीवर गेल्या वर्षी उपकार केले होते. त्यामुळे आम्हाला आता त्यानुसार अपेक्षित निर्णय मिळेल”, असं म्हणत रोहितने आरसीबीला उपकाराची जाणीव करुन दिली.

“आम्ही या हंगामात चांगली सुरुवात केली नाही. मात्र त्यानंतर आम्ही सलग 3 सामने जिंकले. पंजाब किंग्स विरुद्ध आम्ही आणखी चांगलं खेळू शकलो असतो. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामनाही आमच्या हातात होता. मात्र कधीकधी सर्वच आपल्यानुसार होत नाही. मुंबई इंडियन्सचे सर्व सहकारी, सपोर्ट स्टाफ, मालक आणि क्रिकेट चाहत्यांचा त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी मी आभारी आहे”, असं रोहित म्हणाला.

रोहित शर्मा काय म्हणाला?

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.