IPL 2023 Bhojpuri Commentary | ‘मुंह फोडबा का’, क्रिकेट चाहत्यांवर भोजपूरी कमेंट्रीची जादू

स्थानिक भाषेत कमेंट्री हे आयपीएलच्या 16 व्या मोसमाचं वैशिष्ट्य ठरत आहे. या मोसमात एकूण 12 भाषांमध्ये कॉमेंट्री करण्यात येत आहे. यात भोजपूरी कमेंट्रीची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळतेय.

IPL 2023 Bhojpuri Commentary | 'मुंह फोडबा का', क्रिकेट चाहत्यांवर भोजपूरी कमेंट्रीची जादू
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 7:00 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या हंगामात एकूण 5 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं. या 5 सामन्यात काही खेळाडूंना दुखापत झाली. तर काहींनी पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली. मात्र या पलीकडे क्रिकेट चाहत्यांवर भोजपुरी भाषेतील कमेंट्रीने मोहिनी घातली आहे. या भोजपुरी भाषेतील विनोदी गोडव्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी या कमेंट्रीला डोक्यावर घेतलं आहे. सोशल मीडियावर सर्वत्र या भोजपुरी कमेंट्रीची हवा पाहायला मिळतेय. आयपीएल 2023 मध्ये यंदापासून जिओ सिनेमावर एकूण 12 भाषांमध्ये कमेंट्री ऐकता येणार आहे. या 12 भाषेंच्या तुलनेत भोजपुरी भाषेतील कमेंट्री क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.

आयपीएल 2023 मध्ये भोजपुरी भाषेत एकूण 6 जण कमेंट्री करत आहेत. यापैकी अभिनेता आणि खासदार रवी किशन हा भोजपुरी कमेंट्री करतोय. भोजपुरी भाषा आणि त्याला असलेला देसी तडका यामुळे ही कमेंट्री आणखी रंगतदार होतेय.

सोशल मीडियावर चर्चा

भोजपुरी एक्टर रवी किशन याच्या कमेंट्रीत असेलेल काही ठराविक शब्दांची चर्चा आहे. “ई का हो, मुंह फोडबा का?” असे डायलॉग ऐकायला मिळाले. तर कधी ‘सट्ट से अंदर घुस गइल’, “जियs जवान जियs…लही गईल-लही गईल” आणि “अउर हई देखबा”, हे आणि असे विविध डॉयलॉग भोजपुरी कमेंट्रीमध्ये ऐकायला मिळत आहेत.

आयपीएल भोजपुरी कमेंट्री

रवी किशन याने भोजपुरी कमेंट्री केल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला. रवी किशनने या व्हीडिओत आपल्या मातृभाषेत (भोजपुरी) कमेंट्री करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबाबत जिओ सिनेमाचे आभार मानले.

रवी किशनने या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच “जिंदगी झंड बा और पहली बार हुए #iplbhojpuri का घमांड बा !!!! तसेच तुम्ही सर्वांनी मला आणि भोजपुरी भाषेला इतका सन्मान दिलात. यासाठी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे”, असं रवी किशनने या पोस्टमध्ये म्हटलंय.

भोजपुरी कमेंट्री करणारे कॉमेंटेटर

रवी किशन, मोहम्मद सैफ, शिवम सिंह, सत्य प्रकाश, गुलाम हुसैन आणि सौरभ वर्मा.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.