IPL 2023 Orange and Purple Cap | चेन्नई सुपर किंग्सने दिल्लीला नमवल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे ? वाचा
IPL 2023 Orange Cap and Purple Cap | चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 27 धावांनी पराभूत केलं. या विजयासह प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. या सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी कोण ठरलेत? जाणून घ्या
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्रत्येक सामन्यातून प्लेऑफचं गणित स्पष्ट होत आहे. चेन्नई सुपर किंग्सने दिल्लीला 27 धावांनी पराभूत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज असल्याने महेंद्रसिंह धोनीचा हा निर्णय योग्य ठरला. सुरुवातीला फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 8 गाडी 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा संघ 140 धावा करू शकला.
ऑरेंज कॅप कुणाकडे?
या सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी बदललेत का? असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला आहे. आजच्या सामन्यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरचा मान कोणाला मिळाला आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण या सामन्यात ऑरेंज कॅपच्या आसपास जाणं तरी या संघातील खेळाडूंना शक्य नव्हतं.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅप कुणाची
दुसरीकडे या सामन्यात तुषार देशपांडेला पर्पल कॅप मिळवण्याची संधी होती. पण त्याला एकही विकेट मिळाल नाही. तुषार देशपांडेने 3 षटकात 18 धावा दिल्या. एक विकेट जरी घेतला असता तरी पर्पल कॅपचा मानकरी ठरला असता. पण त्याला ते काही शक्य झालं नाही. आता पर्पल कॅपचं मानकरी मोहम्मद शमीच आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
आयपीए 2023 पॉइंट टेबल
गुजरात टायटन्स 16 गुणांसह पहिल्या, चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह दुसऱ्या, मुंबई इंडियन्स 12 गुणांसह तिसऱ्या, लखनऊ 11 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान, कोलकाता, आरसीबी आणि पंजाब किंग्स 10 गुणांसह अनुक्रमे पाचव्या सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. तर सनराइजर्स हैदराबाद आणि दिल्ली 8 गुणांसह अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार / विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा