IPL 2023 Orange and Purple Cap | यशस्वी जयस्वाल याची वादळी खेळी, ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाची?
IPL 2023 Orange Cap and Purple Cap | युझवेंद्र चहल आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे राजस्थान रॉयल्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांना ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये काय फायदा झालाय का? पाहुयात.
पश्चिम बंगाल | राजस्थान रॉयल्स टीमने आयपीएल 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघावर एकतर्फी विजय मिळवला. केकेआरने विजयासाठी दिलेलं 150 धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सने 1 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 41 बॉल राखून पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल हा राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला. यशस्वीने सर्वाधिक नाबाद 98 धावा केल्या. तर जॉस बटलर शून्यावर रनआऊट झाला. संजू सॅमसन याने 48 धावांची नाबाद खेळी केली.
त्याआधी राजस्थानने टॉस जिंकला. कॅप्टन संजू सॅमसन याने कोलकाता नाईट रायडर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र केकेआरच्या फलंदाजांना राजस्थानच्या भेदक माऱ्यासमोर 8 विकेट्स गमावून 20 ओव्हमध्ये 149 धावाच करता आल्या. राजस्थानकडून युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
थोडक्यात काय तर आधी युझवेंद्र चहल याने विजयाचा पाया रचला. तर त्यानंतर यशस्वीने विजयाचा कळस चढवला. या दोन्ही खेळाडूंना याचा चांगलाच फायदा झाला आहे. या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात.
ऑरेन्ज कॅप कुणाकडे?
यशस्वी जयस्वला याने 98 धावांची नाबाद खेळी केली. धावा पूर्ण झाल्याने यशस्वीला नाबाद परतावं लागलं. कदाचित आणखी थोड्या फार धावा असत्या तर यशस्वीचं या मोसमातील आणि एकूण दुसरं शतक पूर्ण झालं असतं.
ऑरेन्ज कॅपचा बादशाह फाफ डु प्लेसिस
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
दुसरी बाब म्हणजे यशस्वीचं शतक झालं असतं, तर त्याला ऑरेन्ज कॅप सुद्धा मिळआली असती. कारण आता आरसीबीच्या फाफ डु प्लेसिस आणि यशस्वी यांच्यातील धावांमध्ये फक्त नि फक्त 1 धावेचा फरक राहिला. त्यामुळे जर यशस्वीचं शतक झालं असतं शतक पूर्ण झालं असतं आणि ऑरेन्ज कॅपही मिळाली असती. मात्र तसं झालं नाही. यामुळे ऑरेन्ज कॅपच्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
पर्पल कॅपने डोकं बदललं
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मात्र पर्पल कॅप ही राजस्थान रॉयल्सला मिळाली आहे. युझवेंद्र चहल याने मोहम्मद शमी याच्याकडून पर्प कॅप हिसकावली आहे. त्यामुळे अनुक्रमे मोहम्मद शमी याची दुसऱ्या, राशिद खान याची दुसऱ्यावरुन तिसऱ्या, तुषारची तिसऱ्यावरुन चौथ्या आणि पियूष चावला याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. तर वरुण चक्रवर्थी बाहेर फेकला गेला.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.