IPL 2023 Orange and Purple Cap | रविवारच्या डबल हेडरनंतर प्लेऑफसाठी चुरस, ऑरेन्ज-पर्पल कॅप कुणाकडे?
IPL 2023 Orange and Purple Cap | आयपीएल 16 व्या मोसमाच्या सुरुवातीपासूनच ऑरेन्ज आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी बॅट्समन आणि बॉलर्स यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. आता मोसम रंगात असताना या दोन्ही कॅप्स कुणाकडे आहेत?
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 14 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स टीमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून 112 धावांनी पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्स टीमचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. आरसीबी आणि केकेआर विजयी झाल्याने दोन्ही संघांचं आव्हान कायम आहे. तर राजस्थानला संधी आहे, मात्र त्या संधीची टक्केवारी कमी झालीय. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल, सोबतच उर्वरित सामन्यांमध्ये विजयही बंधनकारक असणार आहे.
या दोन्ही सामन्यांमुळे ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये बदल होण्याची शक्यता होती. कारण ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत असलेले 4 पैकी 2 आणि स्वत: ऑरेन्ज कॅप होल्डर फाफ असे एकूण 3 खेळाडू या डबल हेडरमध्ये खेळले. त्यामुळे बदल अपेक्षित होता.
ऑरेन्ज कॅपमध्ये मोठा बदल
ऑरेन्ज कॅप आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याच्याकडे आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि डेव्हॉन कॉनवे या तिघांना आपलं स्थान भक्कम करण्याची संधी होती. मात्र फाफने राजस्थान विरुद्ध 55 धावांची खेळी करत ऑरेन्ज कॅप आपल्याकडेच कायम ठेवली. तर डेव्हॉन कॉनवे याने 30 धावा केल्या. त्यामुळे कॉनवे थेट पाचव्यावरुन तिसऱ्या स्थानी आला. यामुळे सूर्यकुमार यादव याची चौथ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे शुबमन गिल चौथ्यावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला.
ऑरेन्ज कॅपमध्ये पाहा काय बदल झाला
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅप कुणाकडे?
आता राजस्थान रॉयल्सच्या 3 विकेट्स घेत पुन्हा पर्पल कॅप मिळवण्याची संधी होती. तर तुषार देशपांडे यालाही पाचव्या स्थानावरुन वर येता आलं असतं. मात्र चहल तुषार दोघांपैकी एकालाही 1 विकेटही घेता आली नाही. त्यामुळे चहलवर याचा काही परिणाम झाला नाही.
पर्पल कॅप कुणाकडे?
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मात्र तुषारची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली. केकेआरच्या वरुण चक्रवर्थी याने 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे चक्रवर्थी याची पाचव्या क्रमांकावर एन्ट्री झाली.
रविवाररच्या डबल हेडरनंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाची?
.@faf1307 dons the @aramco Orange cap at the end of Match 6️⃣1️⃣ of #TATAIPL 2023 ?
Meanwhile @rashidkhan_19 is leading the wicket-tally & is the @aramco Purple Cap holder ? pic.twitter.com/MikmeGCSt4
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.