IPL 2023 Orange and Purple Cap | दिल्ली कॅपिट्ल्स टीमचा विजय, ऑरेन्ज-पर्पल कॅप कुणाकडे?
IPL 2023 Orange Cap and Purple Cap | दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सचा घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 5 धावांनी पराभव केला. यानंतर कोणत्या खेळाडूंना मिळाली ऑरेन्ज आणि पर्पल कॅप?
अहमदाबाद | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये क्रिकेट चाहत्यांना सलग सोमवारी आणि आज मंगळवारी लो स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले. सोमवारी आरसीबीने लखनऊला 18 धावांनी पराभूत केलं. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 127 धावांचा पाठलाग करताना लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 108 धावाच करता आल्या. त्यानंतर आज मंगळवारी 2 मे रोजी पुन्हा निच्चांकी धावसंख्येचा थरार पाहायला मिळाला. पॉइंट्स टेबलच्या खाली असलेल्या दिल्ली कॅपिट्ल्स टीमने टेबल टॉपर गुजरात टायटन्स संघाला मजबूत झटका दिला.
दिल्लीने गुजरातला विजयासाठी 131 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 125 धावाच करता आल्या. विशेष म्हणजे गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या हा नाबाद राहिला. पंड्याने सर्वाधिक नाबाद 59 धावा केल्या. मात्र पंड्यालाही टीमला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अमन खान याच्याअर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 8 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. तर दिल्लीकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर राशिद खान याने 1 विकेट घेतली.
या लो स्कोअरिंग सामन्यानंतर पर्पल आणि ऑरेन्ज कॅपच्या पहिल्या 5 खेळाडूंमध्ये कुठे काही बदल झालाय का, हे आपण पाहणार आहोत.
ऑरेन्ज कॅप कुणाची?
गुजरात विरुद्ध दिल्ली या सामन्यानंतर ऑरेन्ज कॅपमधील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आरसीबीच्या फाफ डु प्लेसिस याच्याकडे ऑरेन्ज कॅप आहे. त्यानंतर अनुक्रमे यशस्वी जयस्वाल, डेव्हॉन कॉनवे, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांचा पहिल्या पाच फलंदाजांमध्ये समावेश आहे. या पहिल्या पाचात आरसीबी आणि चेन्नईचे प्रत्येकी 2 आणि राजस्थानचा 1 असे एकूण 5 फलंदाज आहेत.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
मोहम्मद शमीच्या डोक्यावर पर्पल कॅप
मोहम्मद शमी याने दिल्ली विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या. शमीने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 11 धावांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शमीची ही आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. शमीने यासह सीएसकेच्या तुषार देशपांडे याच्याकडे असलेली पर्पल कॅप हिसकावली. ताज्या आकडेवारीनुसार शमीच्या नावावर 9 सामन्यांमध्ये 17 विकेट्सची नोंद झाली आहे.
शमी अव्वलस्थानी गेल्याने तुषार देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर घसरला. यामुळे मोहम्मद सिराज याची दुसऱ्यावरुन तिसऱ्या क्रमाकांवर घसरण झाली. गुजरात टायटन्सच्या राशिद खान याने दिल्ली विरुद्ध 1 विकेट घेत आपलं चौथं स्थान कायम राखलं. तर पंजाब किंग्स टीमच्या अर्शदीप सिंह हा तिसऱ्या क्रमांकावरुन थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेलाय. तर राजस्थान रॉयल्स संघाचा अनुभवी फलंदाज आर अश्विन हा पहिल्या पाचातून बाहेर पडला आहे.
पर्पल कॅप कुणाची?
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा, अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रोसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्तजे आणि इशांत शर्मा.