IPL 2023 Orange and Purple Cap | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध केकेआर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
IPL 2023 Orange Cap and Purple Cap | एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. तसेच मोसमाअखेरीस ज्याच्या नावावर जास्त धावा आणि जास्त विकेट्स असतात, तो मोसमातील कॅपचा विजेता ठरतो.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात 20 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्याचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु टीमने पंजाब किंग्स टीमवर 24 धावांनी विजय मिळवला. तर दुसरा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स याच्यांत पार पडला. हा सामना पावसामुळे विलंबाने सुरु झाला आणि उशिराने संपला. या विलंबामुळे 20 एप्रिलला सुरु झालेला सामना 21 एप्रिलला संपला. दिल्लीने केकेआरवर 4 विकेट्सने विजय मिळवला. या दोन्ही सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपची अदलाबदल झाली का, तसेच कोणत्या खेळाडूकडे कॅप आहे, हे आपण जाणून घेऊयात.
प्रत्येक सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप डोकं बदलते. ऑरेन्ज आणि पर्पल कॅप म्हणजे एका मोसमात आणि त्या मोसमादरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ओळख म्हणून ऑरेन्ज कॅप दिली जाते. तसेच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप दिली जाते. तर मोसमाच्या शेवटी ज्याच्या नावावर सर्वाधिक धावा आणि विकेट्सची नोंद असते, तो बॅट्समन आणि बॉलर ती कॅप जिंकतो. मात्र मोसमादरम्यान सामन्यानुसार कॅपची अदलाबदल होतच राहते.
ऑरेन्ज कॅप कुणाकडे?
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
खरंतर पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचे विजेते ठरले. या विजेत्यांना दिल्ली विरुद्ध केकेआर या सामन्यामुळे आणि सामन्याच्या निकालाने कोणताही परिणाम झाला नाही. ऑरेन्ज आणि पर्पल या दोन्ही कॅप आरसीबीकडे आहेत. आरसीबी कॅप्टन फाफ डु याच्याकडे ऑरेन्ज तर मोहम्मद सिराज याच्याकडे पर्पल कॅप आहे.
पर्पल कॅप कुणाची?
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
ऑरेन्ज कॅपची चुरस
ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत पहिल्या पाच फलंदाजांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 2 खेळाडू आहेत. यामध्ये अव्वल स्थानी फाफ डु प्लेसिस आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. तर दुसऱ्या स्थानी डेव्हिड वॉर्नर आहे. डेव्हिड वॉर्नर याने केकेआर विरुद्ध 41 बॉलमध्ये 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरला या खेळीचा फायदा झाला. वॉर्नरने यासह विराट कोहसी याला तिसऱ्या क्रमांकावर फेकत स्वत: दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जॉस बटलर आणि वेंकटेश अय्यर आहे. या दोघांमध्ये फक्त 10 धावांचं अंतर आहे. वेंकटेश याला दिल्ली विरुद्ध 11 धावा करुन चौथ्या स्थानी येण्याची संधी होती. मात्र वेंकटेश झिरोवरच आऊट झाला. त्यामुळे जॉसचं चौथं स्थान कायम राहिलं.
पर्पल कॅपमध्ये काय चाललंय?
पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्याआधी लखनऊ सुपर जायंट्स टीमच्या मार्क वूड याच्याकडे पर्पल कॅप होती. मात्र मोहम्मद सिराज याने पंजाब किंग्स विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या आणि वूडकडे असलेली पर्पल कॅप हिसकावली. मोहम्मद सिराज याची 21 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.मात्र सिराजने 6 सामन्यात 12 तर वूडने 4 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी सामन्यात वूडला पर्पल कॅप मिळवण्याची अधिकाअधिक संधी आहे.
तर तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल 11 विकेट्ससह विराजमान आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर एकाच कंपनीचे अर्थात गुजरात टायटन्स टीमचे राशिद खान आणि मोहम्म्द शमी हे दोघे आहेत. राशिदच्या नावावर 5 मॅचमध्ये 11 विकेट्सची नोंद आहे. तर शमीने तितक्याच सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.