IPL 2023 Orange and Purple Cap | सलग 2 दिवसांनंतरही ऑरेंज कॅपची बादशाहत कायम, पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर? जाणून घ्या
IPL 2023 Orange Cap and Purple Cap | आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमादरम्यान ऑरेन्ज आणि पर्पल कॅपची अदलाबादल होत असते. तर मोसमातील अंतिम सामन्याच्या निकालानंतर कायमचा त्या कॅपचा विजेता ठरतो.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. जवळपास प्रत्येक संघात सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं गणित बदलतं तसंच गणित ऑरेंज आणि पर्पल कॅपचं देखील आहे. सामना संपला की संपला जास्त धावा आणि विकेट्सच्या जोरावर या मानाच्या कॅप दिल्या जातात. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात 35 वा सामना पार पडला. पण या दोन्ही संघात ऑरेंज किंवा पर्पल कॅपसाठी कोणता खेळाडूंचं रस्सीखेच पाहायला मिळाली. पण ऑरेंज कॅप त्याच खेळाडूकडे राहिली तर आणि पर्पल कॅप गुजरातच्या खेळाडूने आपल्याकडे ओढली.
आयपीएल स्पर्धेत मोसमानंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा ऑरेन्ज आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा पर्पल कॅप जिंकतो. तर मोसमादरम्यान ऑरेन्ज आणि पर्पल कॅपची अदलाबदल होत असते. ऑरेंज कॅपच्या यादीत मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यानंतर कोणताही बदल झालेला नाही.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पर्पल कॅपचा मान राशीद खानला मिळाला आहे. मोहम्मद सिराजला मागे टाकत त्याने पर्पल कॅप मिळवली आहे. राशीद खानचे 6 सामन्यात एकूण 12 गडी होते आणि तिसऱ्या स्थानावर होता. मात्र मुंबई विरुद्ध 2 गडी बाद करत त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पण हा निर्णय मुंबईला चांगलाच महागात पडला. गुजरातने 20 षटकात 6 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबई इंडियन्सचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मुंबईचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 152 धावा केल्या. गुजरातने मुंबईला 55 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे गुजरात दोन गुणांसह नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.