नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये शनिवारी 29 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिली मॅच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडली. हा सामना गुजरातने 7 विकेट्सने जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद टीमने दिल्ली कॅपिट्ल्स संघावर 9 धावांनी मात केली. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर पर्पल कॅपच्या पहिल्या 5 गोलंदाजांची स्थिती काय आहे, त्यात काही बदल झालाय का, ते आपण जाणून घेऊयात. पहिल्या 4 गोलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण, पाचव्या क्रमांकात बदल झालाय.
केकेआर टीमचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याला गुजरात विरुद्ध एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. मात्र गुजरात टायटन्स टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने केकेआर विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. त्याचा शमीला मोठा फायदा झाला. शमीने यासह चक्रवर्थीला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. हाच एकमेव बदल पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत झालाय. तर पर्पल कॅप ही आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडे कायम आहे.
पर्पल कॅप आकडेवारी
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
ऑरेन्ज कॅपच्या पहिल्या पाचातही पर्पल कॅप प्रमाणे एकमेव बदल झाला आहे. केकेआर विरुद्ध गुजरातच्या शुबमन गिल या युवा ओपनर बॅट्समनने 49 धावांची खेळी केली. त्याचा गिलला मोठा फायदा झाला. गिलने थेट ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. यामुळे सीएसकेच्या डेव्हॉन कॉनवे याची चौथ्या आणि ऋतुराज गायकवाड याची पाचव्या स्थानी घसरण झाली. तर दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार डेव्डि वॉर्नर सहाव्या क्रमांकावर फेकला गेलाय.
ऑरेन्ज कॅप
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
थोडक्यात काय तर या डबल हेडरमधील हैदराबाद विरुद्ध दिल्ली या सामन्यामुळे पर्पल आणि ऑरेन्ज कॅप टॉप 5 च्या समीकरणात कोणताही बदल झाला नाही. मात्र केकेआर विरुद्ध गुजरात या सामन्यामुळे या दोन्ही कॅपच्या पहिल्या पाचात बदल झाला.
केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन, रहमानउल्ला गुरबाज (wk), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटील.