PBKS vs GT | सामन्याच्या काही मिनिटांआधी गुजरात टायटन्स टीमचा कर्णधार पुन्हा बदलला

पंजाब किंग्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघाचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना आहे. मात्र त्याआधी गुजरात टायटन्स टीमने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे. जाणून घ्या आता गुजरातचा कर्णधार कोण?

PBKS vs GT | सामन्याच्या काही मिनिटांआधी गुजरात टायटन्स टीमचा कर्णधार पुन्हा बदलला
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 7:47 PM

मोहाली | आयपीएल 16 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. गुजरात किंग्सने टॉस जिंकला आहे. गुजरातने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या मोसमात पंजाब आणि गुजरात या दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. तर दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून पुन्हा विजयी मार्गावर पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा आहे. त्यामुळे दोन्ही टीमकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी गुजरात टीमने पुन्हा एकदा आपला कर्णधार बदलला आहे.

गुजरातची कॅप्टन्सी कुणाकडे?

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पंड्या याने गुजरात टायटन्स टीममध्ये कमबॅक केलं आहे. हार्दिकने कमबॅकसह गुजरातच्या नेतृत्वाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राशिद खान याला कॅप्टन करण्यात आलं होतं. तेव्हा हार्दिकची तब्येत चांगली नसल्याने हार्दिक सामना खेळला नव्हता. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी ही राशिद खान याला दिली होती. मात्र आता पंड्याला बरं वाटत असल्याने त्याने कमबॅक केलं आणि कॅप्टन्सीची सर्व सूत्र हाती घेतलीत.

केकेआरचा थरारक विजय

गुजरातला कोलकाता विरुद्धच्या सामन्यात घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देऊनही पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातने पहिले बॅटिंग करताना 204 धावा करत केकेआरला 205 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने या विजयी आव्हानाचं उत्तमरित्या पाठलाग केला होता. केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावांची गरज होती. त्यामुळे केकेआरचा पराभव निश्चित मानला जात होता.

हे सुद्धा वाचा

गुजरातकडून शेवटची ओव्हर यश दयाल टाकत होता. तर केकेआरकडून उमेश यादव आणि रिंकू सिंह मैदानात होते. उमेशने पहिल्या बॉलवर एक धावा काढली. त्यानंतर रिंकू स्ट्राईकवर आला. त्यानंतर जे झालं ते उभ्या क्रिकेट विश्वाने पाहिलं. रिंकूने 5 बॉलवर 5 सिक्स मारत अविश्वनसीय कारनामा केला. अशा प्रकारे केकेआरने 204 धावांचं आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण करत 3 विकेट्सने विजय मिळवला.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.