Kagiso Rabada | कगिसो रबाडा याचा कारनामा, मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक
पंजाब किंग्स टीमचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रबाडा याने मुंबई इंडियन्स टीमच्या दिग्गज गोलंदाजाला मागे टाकत आतापर्यंत कुणालाही न जमलेला असा विक्रम केला आहे.
मोहाली | पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात सामना यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील 18 वा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकून पंजाब किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने 153 धावा करत गुजरातला 154 धावांचं आव्हान दिलं. पंजाबकडून ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी गुजरातला अपेक्षित सुरुवात करुन दिली. या दोघांनी 48 धावांची सलामी भागीदारी केली. पंजाब किंग्सच्या कगिसो रबाडा याने पंजाबला ब्रेक थ्रू मिळवून दिला. रबाडा याने ही सलामी जोडी फोडली. रबाडा याने ऋद्धीमान साहा याला गुजरातचा स्कोअर 48 धावा असताना आऊट केलं. रबाडाने ऋद्धीमान याला मॅथ्यू शॉर्ट याच्या हाती कॅच आऊट केलं.
ऋद्धीमानने 19 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. कगिसोने ऋद्धीमानला आऊट करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. कगिसो आयपीएलमध्ये वेगवान 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला. कगिसोने याबाबतीत मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज यॉर्कर किंग लसिथ मलिंगा याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
कगिसो रबाडा याचं ‘शतक’
Milestone ?
A special ? for @KagisoRabada25 ??
The @PunjabKingsIPL pacer gets his 1️⃣0️⃣0️⃣th wicket in #TATAIPL!#PBKSvGT pic.twitter.com/0JkdsxK40Q
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2023
कगिसो याने 64 व्या सामन्यात 100 वी विकेट घेतली. तर मलिंगाने 70 व्या सामन्यात विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं.
आयपीएलमध्ये सामनेनिहाय 100 विकेट्स
कगिसो रबाडा – 64 सामने लसिथ मलिंगा – 70 सामने भुवनेश्वर कुमार – 81 सामने हर्षल पटेल – 81 सामने राशिद खान – 83 सामने
पंजाब किंग्सची बॅटिंग
दरम्यान त्याआधी गुजरातने टॉस जिंकून पंजाब किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. पंजाबकडून सलामी जोडीचा अपवाद वगळता मीडल ऑर्डरमधील सर्व फलंदाजांना अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र यापैकी एकालाही टॉप गिअर टाकत फटकेबाजी करण्यात अपयश आलं. पंजाबकडून मॅथ्यू शॉट याने सर्वाधिक 36 धावा केल्या. जितेश शर्मा याने 25 रन्स केल्या. सॅम करन आणि शाहरुख खान या दोघांनी प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षा याने 20 रन्स केल्या. गुजरातकडून मोहित शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर राशिद खान, अल्जारी जोसेफ, जोशवा लिटील आणि मोहम्मद शमी या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मोहित शर्मा याचं पदार्पण
दरम्यान मोहित शर्मा याने गुजरात टायटन्ससाठी पदार्पण केलं आहे. मोहित शर्मा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना पर्पल कॅपही जिंकली आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. मोहित गेल्या 2 वर्षांपासून आयपीएलपासून दूर होता. मोहित या सामन्याआधी आपला अखेरचा समना हा पंजाब किंग्स विरुद्ध 20 सप्टेंबर 2020 रोजी दुबई क्रिकेट स्टेडियम इथे खेळला होता.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.