IPL 2023, PBKS vs KKR | पंजाबची विजयी सुरुवात, कोलकातावर डीएलएस नियमानुसार 7 धावांनी मात
पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र कोलकाता विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पाऊस पडला. त्यामुळे हा सामना पंजाबने डीएलएस नियमानुसार 7 धावांनी जिंकला.
मोहाली | आयपीएल 16 व्या पर्वातील पहिल्या डबर हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने 7 धावांनी कोलकाता नाईट रायडर्सवर डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कोलकाताकडूनही या आव्हानाचं शानदार पद्धतीने पाठलाग सुरु होता. कोलकाताने 16 ओव्हरमध्ये 7 विकेटस् गमावून 146 धावा केल्या होत्या. सामना शेवटच्या टप्प्यात पोहचला होता. मात्र कोलकाताच्या बॅटिंगदरम्यान 16 ओव्हरनंतर पावसाची एन्ट्री झाली. त्यानंतर काही मिनिंट वाट पाहिल्यानंतर अखेर डीएलएस नियमांनुसार पंजाबला विजयी घोषित करण्यात आलं. अशाप्रकारे पंजाबची मोसमातील विजयी सुरुवात झाली.
पंजाबची बॅटिंग
त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. पंजाबकडून प्रभासिमरन सिंह या ओपनर बॅट्समनने 23 धावांची खेळी केली. शिखर धवन याने 29 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 40 रन्स जोडल्या. भानुका राजपक्षा याने 32 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांचं सर्वाधिक योगदान दिलं. जितेश शर्माने 21 आणि सिकंदर रजा याने 16 धावा केल्या. तर सॅम करन याने नाबाद 26 आणि शाहरुख खान याने नाबाद 11 धावा केल्या. तसेच कोलकाताकडून टीम साऊथी याने 2, उमेश यादव, सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्थी या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाबचा कोलकातावर विजय
Sam Curran joins the wicket party ? and Arshdeep Singh takes another ?@PunjabKingsIPL celebrate departures of Andre Russell and Venkatesh Iyer#KKR need 46 runs in 24 balls#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/wQxzdhLZcX
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
दोन्ही संघातील परदेशी खेळाडू
दरम्यान पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू आहेत. कोलकातामध्ये सुनील नरेन, आंद्रे रसेल, टीम साऊथी आणि रहमानुल्लाह गुरबाज हे आहेत. तर पंजाब किंग्समध्ये भानुरा राजपक्षे, सॅम करण, नॅथन एलिस आणि सिंकदर रझा या चौघांचा समावेश आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, नॅथन एलिस, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, मनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टीम साउथी, अनुकूल रॉय, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.