PBKS vs LSG | पंजाब किंग्स टीममध्ये 3 सामन्यानंतर स्टार खेळाडूची एन्ट्री

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून पंजाब किंग्समध्ये एका मोठ्या, दिग्गज आणि स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे लखनऊच्या गोटात भीतीचं वातावरण आहे.

PBKS vs LSG | पंजाब किंग्स टीममध्ये 3 सामन्यानंतर स्टार खेळाडूची एन्ट्री
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 7:54 PM

मोहाली | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. या 16 व्या सिजनमधील 38 वा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकून लखनऊ सुपर जायंट्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या लखनऊ विरुद्धच्या सामन्यातून एका स्टार खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. तसेच पंजाबने पुन्हा एकदा कॅप्टन बदलला आहे. कोण आहे तो खेळाडू हे आपण जाणून घेऊयात.

‘गब्बर’ शिखर धवन याची दुखापतीनंतर पंजाबमध्ये 3 सामन्यानंतर कमबॅक झालंय. शिखरने कमबॅक करताच कर्णधारपदाची सूत्र हाती घेतली आहेत. शिखर खांदाच्या दुखापतीमुळे गेल्या 3 सामन्यात खेळू शकला नव्हता. शिखरला 13 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून पुढील 3 सामन्यात त्याला मुकावं लागलं होतं. तेव्हा धवनच्या अनुपस्थितीत या मोसमातील सर्वात महागड्या असलेल्या सॅम करणला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

शिखर धवन याची एन्ट्री

दोन्ही संघाची स्थिती सारखीच

लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांची परिस्थिती सारखीच आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. ताज्या आकडेवारीनुसार लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

पंजाबकडून गुरनूर ब्रार याचं पदार्पण

गुरनूर ब्रार याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केलं आहे. आता गुरनूर या आपल्या पहिल्याच सामन्यात आपली छाप कशी सोडतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपर हुड्डा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि नवीन-उल-हक.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.