मुंबई : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्समध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबई संघाने पंजाबवर 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडिअमवर केलेल्या पराभवाचा बदला पलटणने घेतलाच. पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावत 214 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली होती. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे डोंगराएवढं लक्ष्य पूर्ण होईलं वाटत नव्हतं. मात्र सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या खरतनाक बॅटींगच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला आहे.
पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात निराशाजनक झाली. ऋषी धवन याने रोहितला शून्यावर आऊट केलं होतं. त्यानंतर ग्रीन फलंदाजीला आला मात्र 23 धावांवर तोसुद्धा आऊट झाला. ग्रीन आऊट झाल्यावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. दुसरीकडे ईशान किशन यानेही एक बाजू लावून धरली होती. दोघांनी अनुक्रमे 75 धावा आणि 66 धावा केल्या.
ईशान आणि सूर्याने शतकी भागीदारी करत दोघांनी अर्धशतके केलीत. मात्र दोघेही पाठोपाठ आऊट झाले. मागील सामन्यामधील मॅचविनर तिलक वर्मा आणि टीम डेविड हे दोगे मैदानात होते. ज्या अर्शदीप सिंहने स्टम्प मोडले होते त्यालाच वर्माने फोडलं. 10 बॉलमध्ये त्याने नाबाद 23 धावा केल्या, यामध्ये 3 सिक्सर आणि 1 चौकार मारला. या विजयासह मुंबईने आपला हिशोब बराबर केला आहे.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान