Sam Curran : प्रीती झिंटा हिला होतोय पश्चाताप? सॅम करन याने मैदानात असं काही केलंय ज्याने होतोय ट्रोल, पाहा Video
आयपीएल लिलावामध्ये सर्वात महागडा विकला गेलेल्या सॅम करन याचा हलगर्जीपणा पाहिलात का?, व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबई : पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना चालू आहे. यामध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करणयासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब संघाची एकदम खराब सुरूवात झालेली दिसली. 76 धावांवर पंजाबचा अर्ध्याच्या वर संघ तंबूत परतला होता. यामध्ये सर्वात जास्त निराशा केली ती म्हणजे आयपीएलमध्ये सर्वात जास्त किमतीला खरेदी केला गेलेला खेळाडू सॅम करनने निराशा केली. सॅमने हलगर्जीपणाने आपली विकेट गमावली म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नेमकं काय घडलं?
पंजाबची सुरूवात खराब झाली होती, सुरूवातीचे 4 गडी आऊट झाले होते त्यानंतर सॅम करन याने प्रभसिमरन याच्यासोबत पार्टनरशीप केली होती. मात्र 10 व्या ओव्हरमध्ये सॅम करनने पाचव्या चेंडू मारला तो बंगळुरूच्या वानिंदू हसरंगाच्या हातात गेला. त्यावेळी येस नो च्या नादात दोघांचा ताळमेळ बिघडला शेवटी दोघे धाव घेण्यासाठी धावले. करन बॉलकडे पाहत राहिला पण हसरंगाने वेळ न दवडता अचूक थ्रो केला आणि सॅम करनला रन आऊट केलं.
पाहा व्हिडीओ-
Direct-Hit number 2⃣ ?
It’s @Wanindu49 with the throw this time ?#PBKS skipper Sam Curran has to walk back.
Watch Here ? #TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/l9aW1CloRy
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
बंगळुरुचा डाव
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 137 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 47 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. फाफ डू प्लेसिसने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नाथन एलिसच्या गोलंदाजीवर 84 धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकही काही विशेष करू शकला नाही त्याने 5 चेंडू 7 धावा केल्या.
दरम्यान, आयपीएल 2023 च्या लिलावामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन सर्वात महागडा विकला गेला. सॅमला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.