IPL 2023 Playoff : विराट कोहलीचा आरसीबी संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचणार! कसं ते वाचा
आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचं गणित शेवटच्या टप्प्यापर्यंत किचकट झालं आहे. काल परवापर्यंत पहिल्या चारमध्ये असलेले संघ पाचव्या सहाव्या स्थानावर फेकले गेले आहे. तरीही नऊ संघांमध्ये जबरदस्त चुरस आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. अजूनही प्लेऑफचं गणित सुटलं नसल्याने जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. त्यात गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची संधी आहे. राजस्थान रॉयल्सला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने जबरदस्त फायदा झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा केल्या. विजयासाठी 172 धावांचं आव्हान राजस्थानला दिलं होतं. मात्र राजस्थानचा संघ सर्वबाद 59 धावाच करू शकला. राजस्थानचा 112 धावांनी पराभव झाला. त्यामुळे नेट रनरेटमध्ये बंगळुरुला जबरदस्त फायदा झाला आहे. आता पाचव्या स्थानी असून दुसऱ्या स्थानी झेप घेऊ शकतो. कसं ते जाणून घ्या.
आरसीबी संघ 12 गुण आणि +0.166 रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. आता दोन सामने खेळायचे आहेत. म्हणजेच दोन्ही सामने जिंकले तर 16 गुण होतील. टॉप फोरमधील संघाने एक जरी सामना गमावला तर आरसीबीला संधी आहे. आरसीबीचे पुढचे दोन सामने हैदराबाद आणि गुजरातसोबत आहे. 18 मे रोजी हैदराबाद सनराईजर्स आणि 21 मे रोजी गुजरात टायटन्ससोबत सामना आहे.
आरसीबी संघ दुसऱ्या स्थानी कसा झेप घेणार?
- आरसीबीला सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. एका पराभवामुळे प्लेऑफच्या आशा संपुष्टात येतील.
- मुंबई इंडियन्सला पुढील दोन्ही सामने गमवावे लागतील. मुंबईचा 16 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि 21 मे रोजी सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध सामना आहे.
- लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स पराभूत केलं पाहीजे. पण 20 मे रोजी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धचा सामना गमावला पाहीजे. लखनऊचा 20 मे रोजी कोलकात्या विरुद्ध सामना आहे.
- दिल्ली कॅपिटल्सने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं पाहीजे. हा सामना 20 मे रोजी आहे.
- पंजाब किंग्सने त्याच्या उर्वरित दोन सामन्यापैकी एक सामना गमावला पाहीजे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 17 मे आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध 19 मे रोजी सामना आहे. हे दोन्ही सामने पंजाबने जिंकले तरी बंगळुरुचा नेट रनरेट चांगला आहे.
आरसीबीचा संपूर्ण संघ
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.