IPL 2023 Playoff Scenarios | 4 जागांसाठी 10 संघांमध्ये रस्सीखेच, दिल्ली-हैदराबादलाही संधी

आयपीएलच्या गेल्या 16 वर्षांच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच या 16 व्या हंगामात इतक्या सामन्यांनंतरही प्लेऑफसाठी एकही संघ पात्र न ठरल्याची पहिलीच वेळ असावी. अजूनही 10 च्या 10 संघांना संधी आहे. एकदा बघा समीकरण कसं जुळतंय ते.

IPL 2023 Playoff Scenarios | 4 जागांसाठी 10 संघांमध्ये रस्सीखेच, दिल्ली-हैदराबादलाही संधी
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 8:01 PM

मुंबई | आयपीएल 16 वा मोसमात साखळी फेरीतील अवघे काही सामने बाकी आहेत. या 16 व्या सिजनमध्ये साखळी फेरीत एकूण 70 सामन्यांचं आयोजन आहे. त्या 70 पैकी बुधवार 10 मे पर्यंत 55 सामन्यांचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं आहे. मात्र त्यानंतरही एकाही टीमला अजूनही प्लेऑफसाठी क्वालिफाय करता आलेलं नाही. बुधवारी चेन्नई सुपर किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स संघावर विजय मिळवला. दिल्लीचे अजून 3 सामने बाकी आहेत. दिल्लीने उर्वरित 3 सामने जिंकले तरी, दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर करु शकते.

पॉइंट्स टेबलमध्ये बहुतांश टीम या जवळपास सारख्याच पॉइंट्सवर अडकून आहे. त्यामुळेच प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी पहिल्यांदाच इतकी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणती टीम क्वालिफाय करेल, सांगता येत नाही. गुजरात टायटन्सच्या नावावर 8 विजयांसह 16 पॉइंट्स आहेत. तर 3 सामने शेष आहेत. गुजरात प्लेऑफसाठी पात्र ठरणारी पहिली टीम ठरु शकते. मात्र गुजरातचा आगामी 3 सामन्यांमध्ये मोठ्या अंतराने पराभव झाला, तर प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी हुकू शकते.

दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे. दिल्ली अजून या मोसमात 3 मॅच खेळणार आहे. दिल्लीने हे 3 सामने मोठ्या अंतराने जिंकले, तर चेन्नई सुपर किंग्सचाही प्लेऑफमधून बाजार उठू शकतो.

पॉइंट्स टेबलमधील टर्निंग ‘पॉइंट’

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मंगळवारी 9 मे रोजी सामना पार पडला. आरसीबीने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान मुंबईने 16.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली.

तर कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्स विरुद्ध 180 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. केकेआरला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला.

पॉइंट्स टेबलमध्ये ताज्या आकडेवारीनुसार सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिट्ल्स हे दोन्ही संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा या मोसमातून बँड बाज वाजल्याचं निश्चित झालं होतं. मात्र गेल्या 2 सामन्यांच्या निकालानंतर सर्व गणितचं बदललं.

दिल्लीने गेल्या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवलाय. तर हैदराबादने 5 पैकी 2 वेळा प्रतिस्प्रर्धी संघावर मात केलीय. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर, राजस्थान, आरसीबी, आणि पंजाब या चारही संघांकडे 10 पॉइंट्स आहेत. फरक आहे तो फक्त नेट रन रेटचा. तर दिल्लीच्या नावावर 8 पॉइंट्स आहेत.

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत कोणती टीम पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिल, हे सांगणं कठीण आहे. थोडक्यात याचा अर्थ असा की आतापर्यंत साखळी फेरीत झालेल्या 54 सामन्यांपेक्षा उर्वरित सामन्यांना अधिक महत्व असणार आहेत. तसेच हेच उर्वरित सामने निर्णायक ठरणार आहेत.

असं आहे प्लेऑफ जर-तरचं समीकरण

हैदराबाद आणि दिल्ली या दोघांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. हैदराबादला लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि आरसीबी आणि मुंबईचा पराभव करावा लागेल. दिल्लीचा बुधवारी चेन्नई विरुद्ध पराभव झाला. मात्र दिल्लीला चेन्नईला पराभूत करावं लागेल. तर पंजाबला दोन्ही सामन्यात विजय मिळवाव लागेल.

तसेच मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. मात्र मंगळवारी मुंबई विरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीची परिस्थिती वाईट आहे. लखनऊला या मोसमात अनेक चढ उतार बघावे लागले. लखनऊला फक्त एकदाच सलग 2 सामने जिंकता आले आहेत.

लखनऊला मुंबईच्या विजयानंतर दमदार कामगिरी करावी लागेल. लखनऊने एकही सामना गमावला, तर त्याचं भवितव्य हे इतर संघाच्या कामगिरीवर ठरेल. तसेच चेन्नईने एकाच सामन्यात विजय मिळवला, तर दुसऱ्यांच्या कामगिरीवरच लक्ष ठेवावं लागेल. थोडक्यात काय, तर प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या 4 टीमबाबतची माहिती ही प्लेऑफच्याच वेळी मिळाली, तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.

दरम्यान गुरुवारी 11 मे रोजी केकेआर विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर प्लेऑफच्या समीकरणात आणखी काय आणि कसे बदल होतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.