अहमदाबाद | आयपीएल क्वालिफायर 2 मध्ये शुक्रवारी 26 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. गुजरातने यंदा सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये धडक मारलीय. मात्र क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईकडून पराभव झाला. मात्र गुजरात साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी होती. त्यामुळे फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी गुजरातला मिळाली आहे. तर पलटणने लखनऊ सुपर जायंट्सचा एलिमिनेटरमध्ये लखनऊचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये एन्ट्री केली आहे. आता आयपीएल 2023 फायनलची दुसरी टीम कोण हे येत्या 24 तासात स्पष्ट होईल.
दरम्यान गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील क्वालिफायर 2 च्या निमित्ताने या दोन्ही संघांची एकमेकांसमोरची आकडेवारी कशी आहे, हे आपण जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय. मात्र ही आकडेवारी झाली साखळी फेरीतील. तर आता ही क्वालिफायर 2 म्हणजे सेमी फायनल मॅच आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दोन्ही संघ जीव तोडून प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे फक्त आकड्यानुसार कोणत्याही टीमला गृहीत धरुन चालणार नाही.
क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सामना कधी कुणाच्या बाजूने पलटेल हे सांगता येत नाही. मुंबई आणि गुजरात या टीमचे दोन्ही खेळाडू जबरदस्त कामगिरी करतायते. त्यामुळे आता गुजरात आणि मुंबई यापैकी कोणती टीम चेन्नई विरुद्ध अंतिम फेरीत खेळेल हे लवकरच स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.