Ishan Kishan याने Shubman Gill याच्या कानाखाळी जाळ काढला? व्हीडिओ व्हायरल
आयपीएल 16 व्या मोसमातील क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर शुबमन गिल आणि इशान किशन यांच्यामध्ये नक्की काय झालं?
अहमदाबाद | आयपीएल 2023 मोसमात शुक्रवारी 26 मे रोजी क्वालिफायर 2 सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स टीमने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी धुव्वा उडवला. गुजरातने यासह सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली. शुबमन गिल याच्या 129 धावांच्या शतकाच्या जोरावर गुजरातने मुंबईला विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईला मोहित शर्माच्या भेदक माऱ्यासमोर 18.2 ओव्हरमध्ये 171 धावाच करता आल्या. मोहित शर्माने 5 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
गुजरातने फक्त मुंबईचा पराभवच नाही केला, तर पलटणची 2017 पासून सुरु असलेली घोडदौड रोखली. मुंबईने प्लेऑफमध्ये 2017 पासून एकदाही सामना गमावला नव्हता. मात्र गुजरातने पलटणच्या या विजयी मालिकेला ब्रेक लावला. मुंबईचं यासह फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंगलं. सामना पार पडल्यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन पार पडलं. यानंतर दोन्ही संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफने हस्तांदोलन केलं.
दोन्ही संघांकडून मॅचविनर शुबमन गिल याचं कौतुक केलं. या दरम्यान शुबमन गिल आणि मुंबईचा इशान किशन हे कट्टर मित्र हे समोरासमोर आले. या दरम्यान इशानने शुबमनचं मस्तीत मस्तीत डोकं धरलं. तसेच इशानने शुबमनला मस्तीत कानाखाली मारली. इशान आणि शुबमन नेहमी एकमेकांचं मस्तीत कानफाट लाल करत असतात.
गुजरात टायटन्स टीमचा विजयी जल्लोष
Congratulations to the Gujarat Titans, who march to the #Final of the #TATAIPL for the second-consecutive time ?
They complete a formidable 62-run win over Mumbai Indians ????#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @gujarat_titans pic.twitter.com/rmfWU7LJHy
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
दरम्यान आता रविवारी 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.