Shubman Gill | शुबमन गिल याला चान्स मुंबईची वाट, पलटणने कॅचसह मॅचही सोडली?

मुंबई इंडियन्सने निर्णायक आणि करो या मरोच्या सामन्यात घोडचूक केली आहे. पलचटणच्या खेळाडूंनी धोकादायक शुबमन गिल याला तब्बल 3 वेळा आऊट करण्याची संधी सोडलीय.

Shubman Gill | शुबमन गिल याला चान्स मुंबईची वाट, पलटणने कॅचसह मॅचही सोडली?
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 9:51 PM

अहमदाबाद | मुंबई इंडियन्स टीमने आयपीएल 2023 क्वालिफायर 2 या निर्णायक मॅचमध्ये टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने चेजिंगचा निर्णय घेत गुजरात टायटन्स टीमला बॅटिंगसाठी भाग पाडलं. या संपूर्ण मोसमात मुंबईने शानदार फिल्डिंग केली. मात्र या निर्णायक सामन्यात माती खाल्ली आहे. मुंबईने या आरपारच्या लढाईत 3 वेळा सारखीच चूक केली आहे. मुंबईला ही चूक आता चांगलीच महागात पडली आहे. मुंबईला या चुकीमुळे पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

नक्की काय झालं?

मुंबई इंडियन्स टीमने गुजरातचा इनफॉर्म बॅट्समन शुबमन गिल याला एक नाही, 2 नाही,तब्बल 3 जीवनदान दिले. मुंबईने शुबमन गिल याच्या 2 कॅच सोडल्या. तर विकेटकीपर इशान किशन याने 1 स्टपिंग सोडली. त्यामुळे ही चूक मुंबईला चांगलीच भारी पडलीय. शुबमनने या जीवनदानाचं फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली आहे.

शुबमनला 3 संधी, मुंबईने मॅच गमावली?

मुंबईची घोडचूक, शुबमनकडून संधीचा फायदा

शुबमनला पहिलं जीवनदान

मुंबई इंडियन्स टीमने शुबमन गिल याला 30 धावांवर पहिलं जीवनदान दिलं. गुजरातच्या डावातील सहावी ओव्हर ख्रिस जॉर्डन टाकत होता. या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर शुबमन गिलने फटका मारला. गिलने मारलेला फटका उंचपुऱ्या टीम डेव्हिडच्या दिशेने गेला. टीम डेव्हिड याने शानदार प्रयत्न करत हवेत झेप घेतली. टीमने शुबमनचा कॅच जवळपास पकडलाच होता. मात्र टीमच्या हातून कॅच सटकला. टीमने कॅच घेण्याचा कमालीचा प्रयत्न केला. मात्र अशा सामन्यात या कॅच होणं अपेक्षित असतं.

त्यानंतर शुबमनला आठव्या ओव्हरमध्ये कुमार कार्तिकेय याच्या बॉलिंगवर 2 जीवनदान मिळालं. या आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर शुबमनच्या पॅडला कट लागला. त्यानंतर शुबमन क्रीजमधून बाहेर आला होता. विकेटकीपर इशान किशन याला स्टंपिंग करण्याची काहीशी संधी होती. मात्र शुबमनच्या पॅडला बॉल लागून गेल्याने इशानला बॉल कलेक्ट करण्यात वेळ लागला. तेव्हापर्यंत शुबमन क्रीजमध्ये परतला.

त्यानंतर पुढील बॉलवर शुबमनने डीप मीड विकेटच्या दिशेने फटका मारला. शुबमनने मारलेला फटका तिळक वर्माच्या 2-3 इंच पुढे पडला. क्रिकेट चाहत्यांचं निर्णायक सामन्यांमध्ये अशा कॅच व्हायला हव्यात, असं मत आहे. पण ही कॅच सुद्धा शक्य झाली नाही. मुंबईने अशा प्रकारे शुबमनला 3 जीवनदान दिले.

शुबमनने या संधीचा पूर्ण फायदा घेत गुजरातसाठी मोठी खेळी साकारली. शुबमनने या संधीचा फायदा घेत शुबमनने पुन्हा एकदा शतक ठोकलं. शुबमनचं हे या 16 व्या मोसमातील तिसरं शतक ठरलं. शुबमनने एकूण 60 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 7 फोरसह 129 धावांची खेळी केली. मुंबईला शुबमनची कॅच सोडणं एकूण 99 धावांनी महाग पडली.

पलटणमध्ये एकमेव बदल

रोहितने या सामन्यासाठी टीममध्ये स्पिनच्या जागी लेफ्ट आर्म स्पिनला प्राधान्य देण्याचा निर्णय केला आहे. या सामन्यासाठी ऋतिक शौकीन याच्या जागी कुमार कार्तिकेय याला संधी देण्यात आली आहे. खेळपट्टीचा अंदाज घेत रोहितने ही खेळी केली आहे. आता रोहितचा हा निर्णय किती योग्य ठरतो,याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय. मात्र ही आकडेवारी झाली साखळी फेरीतील. तर आता ही क्वालिफायर 2 म्हणजे सेमी फायनल मॅच आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दोन्ही संघ जीव तोडून प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे फक्त आकड्यानुसार कोणत्याही टीमला गृहीत धरुन चालणार नाही.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.